७० पैशांनी महागले पेट्रोल, डिझेलच्या दरातही वाढ

दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल होत असल्याने त्याचा परिणाम दरांवर होतो. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किंमतीमध्ये मोठा उतार-चढ़ाव पाहायला मिळतोय. आता सामान्य माणसासाठी ही वाईट बातमी आहे. ब्रेंट क्रूडने यंदाच्या वर्षात दुसऱ्यांदा ७०चा आकडा पार केलाय. याआधी ब्रेंट क्रूडने ३१ जानेवारीला ७० डॉलरचा आकडा पार केला होता. त्यावेळी क्रूडचा भाव ७०.९७ इतका पोहोचला होता. 

Updated: Mar 27, 2018, 08:52 AM IST
७० पैशांनी महागले पेट्रोल, डिझेलच्या दरातही वाढ title=

नवी दिल्ली : दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल होत असल्याने त्याचा परिणाम दरांवर होतो. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किंमतीमध्ये मोठा उतार-चढ़ाव पाहायला मिळतोय. आता सामान्य माणसासाठी ही वाईट बातमी आहे. ब्रेंट क्रूडने यंदाच्या वर्षात दुसऱ्यांदा ७०चा आकडा पार केलाय. याआधी ब्रेंट क्रूडने ३१ जानेवारीला ७० डॉलरचा आकडा पार केला होता. त्यावेळी क्रूडचा भाव ७०.९७ इतका पोहोचला होता. 

तज्ञांच्या मते क्रूडच्या किंमतीत अशीच वाढ होत राहिली तर येणाऱ्या दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ होऊ शकते. दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात ११ पैशांची वाढ पाहायला मिळाली. २७ मार्च दिल्लीत पेट्रोलचे दर ७२.९० रुपये प्रती लीटर होते. 

७० पैशांनी महागले पेट्रोल

पेट्रोलबाबत बोलायचे झाल्यास एका आठवड्यात पेट्रोल ७० पैशांनी महागले. २१ मार्चला राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ७२.२० रुपये प्रती लीटर होते. तर २७ मार्चला हे दर ७२.७९वर पोहोचले. तर २१ मार्चला डिझेलचे दर ६२.८० रुपये प्रती लीटर होते. मात्र २७ मार्चला हे दर ९७ पैशांनी वाढले. 

क्रूड महागण्याचे कारण

आर्थिक तंगीमुळे व्हेनेझुएलाचे उत्पादन कमी होणे, इराणवर बंद आणि सौदीसह इतर देशांमध्ये सुरु असलेल्या राजकीय तणावामुळे क्रूड तेलाच्या किंमती वाढतायत.