मुंबई : देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर आज पुन्हा एकदा वाढले आहेत. पेट्रोल १४ पैसे तर डिझेल ११ पैशांनी महाग झालं आहे. नजीकच्या भविष्यात हे दर खाली येण्याची शक्यताही हळहळू मावळत चालली आहे. कच्च्या तेलाचे भाव पुन्हा एकदा बॅरलमागे १०० डॉलरच्या घरात जाण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय बाजारात वर्तवण्यता येत आहे.
आज मुंबईत पेट्रोलचे दर 90.22 रुपये तर डिझेल 78.69 रुपयांवर पोहोचलं आहे.दिल्लीत पेट्रोल 82.86 तर डिझेल 74.12 रुपये प्रति लीटरने मिळत आहे.
Petrol & Diesel prices in #Delhi are Rs 82.86 per litre & Rs 74.12 per litre, respectively. Petrol & Diesel prices in #Mumbai are Rs 90.22 per litre & Rs 78.69 per litre, respectively. pic.twitter.com/hs3dbrwfq4
— ANI (@ANI) September 25, 2018
रविवारी झालेल्या ओेपेक या कच्च्या तेलाचं उत्पादन करणाऱ्या देशांच्या संघटनेच्या बैठकीत भाव कमी करण्यासाठी कुठलीही ठोस पावलं उचण्यात येणार नाहीत असं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे आधीच ८० डॉलरचा टप्पा ओलांडलेले कच्च्या तेलाचे भाव आणखी वाढणार आहेत.
दुसरीकडे अमेरिका आणि युरोपियन युनियनने सीरियासह तेलउत्पादक देशांवर आर्थिक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ही स्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जगभरात महागाई वाढण्याची शक्यता आहे. इंधनाचे दर वाढल्यानं त्याचा सरळ प्रभाव महागाईवर होतो. त्यामुळे इतर वस्तूंच्या किंमती देखील वाढणार आहेत.
नाशिक
पेट्रोल - 90.78
डिझेल - 78.10
शिर्डी
पेट्रोल - 90.40
डिझेल - 77.66
रायगड
पेट्रोल - 90 .32
डिझेल - 77. 56
जळगाव
पेट्रोल - 91.17
डिझेल - 78.40
कोल्हापूर
पेट्रोल - 90.29
डिझेल - 77.61
पुणे
पेट्रोल - 90.10
डिझेल - 77.20
औरंगाबाद
पेट्रोल - 91.26
डिझेल - 79.75