मुंबई : पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा कपात झालीय. पेट्रोलचे दर प्रति लिटर १९ पैशांनी तर डिझेलचे दर प्रति लिटर १२ पैशांनी कमी झालेत. मुंबईत पेट्रोलचा दर ८४ रुपये ४९ पैसे तर डिझेलचा दर प्रति लिटर ७७ रुपये ६ पैसे झालाय.
दिल्लीतही पेट्रोलचे दर १९ पैशांनी कमी झाले आहेत. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर ७८ रुपये ९९ पैसे प्रति लिटर असेल तर डिझेलच्या किंमती प्रति लिटर ११ पैशांनी कमी झाल्यात. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर ७३ रुपये ५३ पैसे झालाय.
शुक्रवारी पेट्रोलच्या दरांत १९ पैसे आणि डिझेलच्या दरांत १४ पैशांची घसरण झालीय. या घसरणीनंतर मुंबईत पेट्रोल ८४.६८ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ८४.६८ प्रति लीटर झालंय... तर राजधानी दिल्लीत पेट्रोल ७९.१८ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ७३.६४ प्रति लीटर झालंय.
गेल्या काही दिवसांत इंधनाचे दर गगनाला भिडलेले दिसले... यावर स्पष्टीकरण देताना आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमतीत होणाऱ्या वाढीमुळे दर वाढत असल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून दिलं जात होतं. यावर रोधकांकडून जोरदार टीका होतेय.
मागील १५ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या किंमतीत काही अंशी का होईना घट होताना दिसतेय. मात्र पेट्रोल अजूनही ८० च्या खाली येत नसल्याने सर्वसामान्यांकडून नाराजी आहे