Petrol Diesel Price on 24 April 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती बरोबर पेट्रोल डिझेलच्या ही दरात चढ उतार होत आहे. तुम्ही जर चारचाकी किंवा दुचाकीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरण्याच्या घाईत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर भारतीय तेल कंपन्यांनी आज (24 एप्रिल 2023) सकाळी 6 वाजता जाहीर केले असून काही शहरांमध्ये दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बद्दल झाले आहेत. जाणून घ्या तुम्हाल एक लीटर पेट्रोलसाठी किती पैसे मोजावे लागणार आहेत...
हिमाचल प्रदेशात पेट्रोल 59 पैसे, मध्य प्रदेशात 57 पैसे, पश्चिम बंगालमध्ये 42 पैसे आणि उत्तर प्रदेशात 33 पैशांनी पेट्रोल महागले आहे. त्याचवेळी पंजाबमध्ये पेट्रोल 52 पैशांनी, बिहारमध्ये 43 पैशांनी आणि राजस्थानमध्ये 37 पैशांनी स्वस्त झाले आहे. याशिवाय नोएडामध्ये पेट्रोलचा दर 96.79 रुपये आणि डिझेलचा दर 89.96 रुपये प्रति लिटर आहे. गाझियाबादमध्ये पेट्रोलचा दर 96.58 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचा दर 89.75 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. त्याच वेळी, गुरुग्राममध्ये पेट्रोलचा दर 97.18 रुपये आणि डिझेलचा दर 90.05 रुपये प्रति लिटर आहे. काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. तर महानगरांमध्ये इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही.
वाचा : अवकाळी रिटर्न्स! हवामान विभागाकडून या आठवड्यासाठी मिळाला महत्त्वाचा इशारा
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.
तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.