मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या पाच दिवसांत सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. सोमवारी दिल्लीत पेट्रोलच्या दरात 31 पैसे दराने वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किंमतीत 39 पैशांनी वाढ झाली आहे. सोमवारी किंमतीत वाढ झाली असून आता एक लीटर पेट्रोल 79.15 रुपये झालं आहे.
तर डिझेलची किंमत 71.15 रुपये प्रति लीटर दर आहे. मुंबईत सोमवारी पेट्रोलची किंमत 31 पैशांनी वाढली असून आता दर 86.56 रुपये इतका आहे. तर डिझेलमध्ये 44 पैशांनी वाढ झाली आहे. ज्याचा दर आता 75.54 रुपये प्रती लीटर आहे.
Petrol at Rs 79.15/litre (increase by Rs 0.31/litre) and diesel at Rs 71.15/litre (increase by Rs 0.39/litre) in Delhi. Petrol at Rs 86.56/litre (increase by Rs 0.31/litre) and diesel at Rs 75.54/litre (increase by Rs 0.44/litre) in Mumbai pic.twitter.com/LCcn8S22p4
— ANI (@ANI) September 3, 2018
या अगोदरच्या रविवारी पेट्रोल 16 पैशांनी वाढलं होतं. आणि डिझेल 34 पैशांनी. गेल्या पाच दिवसांत सतत पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ होताना दिसत आहे. डिझेलच्या दराने आता उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी डिझेलच्या दरात 28 पैशांनी वाढ झाली.