Petrol Diesel Price Today: खूशखबर! आता नाही मोजावे लागणार जास्त रुपये, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

Petrol and Diesel Price Today: यावर्षी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या गगनाला भिडल्या होत्या (Petrol Price Stable) परंतु आता येत्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये स्थिरता पाहायला मिळते आहे. त्यामुळे तुम्हाला आता जास्त पैसे (Fuel Price Unchanged in India) मोजावे लागणार नाहीत. जाणून घ्या आजचे दर!

Updated: Mar 17, 2023, 11:11 AM IST
Petrol Diesel Price Today: खूशखबर! आता नाही मोजावे लागणार जास्त रुपये, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर title=
Petrol and Diesel Price stable today know the latest rates of petrol and diesel in your city

Petrol and Diesel Price Today: सध्या सगळीकडेच महागाईचं (Inflation) संकट वाढू लागलं आहे. त्याचबरोबर येत्या काही काळात मोठ्या आर्थिक मंदीलाही (Financial Crisis) सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यातून आता पेट्रोल-डिझेलच्या (Petrol and Diesel) किमतीही वाढू लागल्या आहेत. परंतु काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ना घट ना वाढ होताना दिसते आहे. त्यामुळे यंदाच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किमती संथ गतीनं वाढण्याची शक्यता आहे. जगातील बाजारातही इंधनची वाढ फारशी (Fuel Price) झाली नसल्याचे दिसते आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या स्थिरस्थावरच आहेत. तेव्हा आज तुम्हाला आम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत. गेल्या काही दिवसांपासून इंधनचे वाढते दर पाहता गेल्या 27 वर्षातला दरवाढीचा विक्रम पेट्रोल डिझेलच्या किमतीत झाला होता. 

तुमच्या शहरात काय आहेत आजचे दर? 

मुंबईत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर हे सारखेच आहे. मुंबईत पेट्रोल हे 106.31 प्रति लीटर आहे तर डिझेल हे 94.27 प्रति लीटर एवढे आहे. दिल्लीत पेट्रोल हे 96.72 प्रति लीटर तर डिझेल हे 89.62 प्रति लीटर इतकं आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रूपये प्रति लीटर तर डिझेल हे 94.24 प्रति लीटर आहे. कोलकाता येथे पेट्रोल हे 106.03 प्रति लीटर तर डिझेल 92.76 प्रति लीटर इतकं आहे. 

मार्च महिना सुखकर?

येत्या मार्च महिन्यापासून पाहिले तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये स्थिरता दिसून येते आहे. त्यातून आता सगळीकडेच महागाईची चिंता असताना पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही वाढतील का अशी शक्यता असताना पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी या महिन्यात ग्राहकांना दिलासा दिला आहे. त्यामुळे ग्राहकांना जास्त पैसे आज तरी मोजावे लागणार नाहीत. सध्या कच्च्या तेलाच्या किमतींमध्येही लक्षणीय वाढ होताना दिसते आहे. येत्या काळात आता इंधनाच्या किमती काय असणार आहेत हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण 31 मार्चनंतर नवीन आर्थिक वर्षे (Financial Year) सुरू होणार आहे. तेव्हा त्यानूसार नव्या किमतींनाही तोंड द्यावे लागू शकते.

सात दिवसात इंंधनाचे दर काय?

गेल्या सात दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ही सारख्याच राहिल्या असून आणि आता किमतीही त्याच आहेत. गेल्यावर्षी पेट्रोलच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली होती. मे एप्रिल महिन्यात तर पेट्रोलची किंमत ही 120 रूपये प्रति लीटरवर होती तर डिझेल 104 रूपयांच्या आसपास होते.