नवी दिल्ली : सलग १२ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. आज पेट्रोल ३० पैसे तर डिझेल २१ पैसे स्वस्त झालं आहे. गेल्या अकरा दिवसात पेट्रोलचे दर २ रुपये ७५ पैसे कमी झाले आहेत.
डिझेलच्या दरात १ रुपये ७४ पैसे कपात करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यात आंततराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव उतरले आहेत. शिवाय डॉलरचा भाव ७३ आणि ७४ रुपयांच्यामध्ये स्थिर होताना दिसतोय.
दोन्ही बाजूंनी होणारी घसरण थांबल्यामुळे आता इंधन दरवाढीलाही ब्रेक लागलाही लगाम बसलाय. ऐन दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल डिझेलच्या भावात घट होत असल्यानं जनतेच्या दिलासा मिळतोय.