Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. गेले काही दिवस दरांमध्ये वाढ झाल्यानंतर आता कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा घसरल्या आहेत. डब्लूटीआय (WTI) क्रूड ऑइल प्रति बॅरल 75.70 डॉलरपर्यंत घसरले आहे आणि ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल 79.69 डॉलरच्या जवळ पोहोचले आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. आजही चालकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जसेच्या तसे आहेत.
मात्र जुलै महिना संपून 20 दिवस उलटले तरी पेट्रोल-डिझेलबाबत सर्वसामान्यांना दिलासा मिळत नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होऊन वर्षभराहून अधिक काळ लोटला आहे. 20 जुलैसाठी देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर आजही स्थिर आहेत.
गुरुवारी देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत गुरुवारी पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध आहे. याशिवाय, चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लिटर आहे. त्याच वेळी, गुरुवारी कोलकाता येथे पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यानंतरही गेल्या 14 महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून देशांतर्गत बाजारपेठेतील पेट्रोल-डिझेलचे दर त्याच दरावर कायम आहे. अशातच गुरुवारीही देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 20 जुलै 2023 रोजीही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळ सलग 429 व्या दिवशी देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, लवकरच देशात पेट्रोलचे दर 15 रुपयांपर्यंत खाली आणले जातील. मात्र, हे कधी होणार, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.