नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेल महागलं आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर लगेचच पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोल 17 पैसे आणि डिझेल 21 पैशांनी वाढलं आहे. पेट्रोल-डिझेलचे दर 19 दिवसांपासून स्थिर होते. 19 दिवसानंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहे. कर्नाटक निवडणुकीमुळे 24 एप्रिलपासून भाव वाढू दिले गेले नव्हते. कर्नाटक निवडणुकीमुळे भाव वाढवले गेले नसल्याचं म्हटलं जातं आहे.
दिल्लीमध्ये पेट्रोलचे भाव 17 पैशांनी वाढला आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल 74.99 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. डिझेलचा भाव 21 पैशांनी वाढला आहे. डिझेल 66.14 रुपये प्रति लीटर झालं आहे. पेट्रोल 55 महिन्यांच्या सर्वाधिक किंमतीवर पोहोचलं आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 17 पैशांनी वाढून 82.65 प्रति लीटरवर पोहोचलं आहे. डिझेल 23 पैशांनी महागलं असून 70.43 रुपयांवर पोहोचलं आहे.
ऑईल मार्केटिंग कंपनी (IOC, HPCL, BPCL) ने पेट्रोल-डिझेलच्या रोजच्या वाढत्या किंमतींवर कर्नाटक निवडणुकीमुळे रोख लावली होती. यामुळे कंपन्यांना नुकसान होत होतं. त्यामुळे आता कंपनी रोज हळूहळू दर वाढवतील. अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत रुपया 15 महिन्य़ांच्या सर्वाधिक खालच्या स्तरावर पोहोचला आहे. कच्चं तेल खरेदी करणं यामुळे कंपन्यांना कठिण झालं होतं. त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आणखी 5 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
सीनियर अॅनालिस्ट अरुण केजरीवाल यांच्या मते, 'हे आधीच ठरलं होतं की, पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतील. पण ही छोटीशी वाढ आहे. आता अजून किंमती वाढणार आहेत. पेट्रोल 4 ते 5 रुपयांनी आणि डिझेल 2 ते 3 रुपयांनी आणखी वाढणार आहे. पण एका दिवसातच ही वाढ नाही होणार.'
2017 मध्ये डिसेंबर महिन्यात गुजरात निवडणुकीनंतर देखील पेट्रोल-डिझेलच्या किंमती 15 दिवसापर्यंत वाढू दिल्या नव्हत्या. निवडणुकीनंतर लगेचच पेट्रोल आणि डिझेल 2 रुपयांनी वाढलं होतं.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या की, इतर वस्तूंचे दर देखील वाढतात. आता क्रूड तेल महागल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमती देखील वाढणार आहे. सोबतच इतर वस्तूंचे दर देखील वाढणार आहे.