कर्नाटक निवडणूक: कोणत्या पक्षावर लावला जातोय सर्वाधिक सट्टा

पाहा सट्टा बाजारात कोणत्या पक्षावर लावला जातोय सर्वाधिक सट्टा

Updated: May 14, 2018, 08:14 PM IST
कर्नाटक निवडणूक: कोणत्या पक्षावर लावला जातोय सर्वाधिक सट्टा title=

बंगळुरु : 15 मेला कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. कर्नाटकात कोणाची सत्ता येते याची उत्सूकता सगळ्यांनाच आहे. सट्टा बाजारात देखील याची जोरदार चर्चा आहे. सट्टेबाजारात वेगवेगळ्या निवडणुकांवर सट्टा लागतो. कोणता पक्ष सत्तेत येईल त्यानुसार पक्षावर सट्टा लावला जातो. भारतीय जनता पक्षाच्या विजयावर सट्टा लावला जातो आहे. सट्टा बाजारात राज्यात कोणत्याच पक्षाला बहुमत नाही मिळणार याची देखील चर्चा आहे. सरकार बनवण्यासाठी भाजप तिसऱ्या पक्षाची मदत घेईल. तो तिसरा पक्ष जेडीएस असू शकतो. अशातच निर्णायक भूमिका जेडीएसची असणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या 222 जागांसाठी शनिवार मतदान झालं. एक्झिट पोलमध्ये त्रिशंकू स्थितीची शक्यता वर्तवण्यात आली होती.

भाजप सर्वात मोठा पक्ष 

कर्नाटकात जरी त्रिशंकु विधानसभेचा दावा केला जात असेल तरी भाजप सर्वात मोठा पक्ष असेल अशी सट्टेबाजारात चर्चा आहे. भाजपला 96-98 जागा, काँग्रेसला 85-87 जागा मिळण्याची शक्यता आहे. सट्टा बाजारात भाजपसाठी 96 तर काँग्रेससाठी 85 चा भाव सुरु आहे.

इकोनॉमिक टाइम्सच्या बातमीनुसार, 'सट्टा बाजारात भाजपवर सर्वात जास्त पैसा लावला जात आहे. सट्टेबाजांना विश्वास आहे की राज्यात भाजपची सत्ता येईल. पण यासाठी तिसऱ्या पक्षाची मदत घ्यावी लागेल. माजी पंतप्रधान एच डी देवगौडा यांच्या जेडीएसला 32-35 जागा मिळण्याची शक्यता आहे. जेडीएस किंगमेकरच्या भूमिकेत असेल.'

सट्टा लावणं बेकायदेशीर

भारतात सट्टा लावणं बेकायदेशीर आहे. पण काही वेबसाइटवर हा सट्टा चालतो. सट्टा बाजारात पैसा गमावण्य़ाची शक्यता मोठी असते. या प्रकरणात कायदेशीर मदत देखील नाही घेऊ शकत.