मुंबई : एलआयसीच्या (LIC) अनेक योजना अशा आहेत की, त्यांच्या मॅच्योरिटीवर मोठी रक्कम परताव्याच्या स्वरूपात मिळू शकते. एवढेच नाही तर, एलआयसीच्या काही योजना विमा कवर प्रदान करतात. विमाधारकाचा अपघात किंवा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला विम्याचा पूर्ण लाभ मिळतो. यामध्ये जीवन प्रगती योजनासारख्या योजना मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत.
जर तुम्ही एलआयसी जीवन प्रगती योजनेमध्ये 28 लाख रुपयांची मॅच्योरिटी घेऊ इच्छित असाल तर, तर तुम्हाला 6 हजार रुपये प्रति महिना साधारण 200 रुपये प्रतिदिवस बचत करणे गरजेचे असेल. ही बचत 20 वर्षे चालू ठेवल्यास, तुम्हाला परताव्याच्या स्वरूपात 28 लाख रुपये मिळू शकतील.
मॅच्योरिटीच्या कालावधी दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या नॉमिनीला त्याचे पैसे मिळतील.
ही बचत आणि सुरक्षांच्या लाभांसह एक गैर-लिंक्ड योजना आहे. ही एक वयक्तिक योजना आहे, ज्यामध्ये व्यक्तीला योजना बनवता येते.
प्रीमियमचे पेमेंट करण्यासाठी वार्षिक, त्रैमासिक, अर्ध-वार्षिक आणि मासिक पर्यायांची निवड करू शकतात.
पॉलिसी अवधी - कमीत कमी 12 वर्षांची आणि कमाल 20 वर्ष इतकी असते.
सम एश्योर्ड, फायनल एक्स्ट्रा बोनस (एफएबी)आणि सिंपल रिपिट बोनसचे पेमेंट मॅच्युरिटीवर केले जाते. तुम्ही विमा रक्कम किमान 1.5 लाख रुपये आणि कमाल कितीही रक्कम जमा करू शकता.
अंतिम अतिरिक्त बोनस (FAB)आणि साधारण पुनरीक्षण बोनस मृत्यू विमा राशीवर दिला जातो. विमाधारकाचा मृत्यू झाल्यास मृत्यू विम्याची रक्कम वार्षिक प्रीमियमच्या 10 पट अधिक असू शकते. जर जर पॉलिसीच्या 5 वर्षांच्या आत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला सम एश्योर्डचा 100 टक्के हिस्सा मिळतो.