विधानसभा निवडणुकीत इतक्या टक्के लोकांनी दाबलं 'नोटा'चं बटन

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. दोन्ही जागी भाजपने बहुमत मिळवलं आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 19, 2017, 11:46 AM IST
विधानसभा निवडणुकीत इतक्या टक्के लोकांनी दाबलं 'नोटा'चं बटन title=

अहमदाबाद : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. दोन्ही जागी भाजपने बहुमत मिळवलं आहे.

दोन्ही राज्यात भाजपला बहुमत मिळालं असलं तरी लोकांचा राग देखील दिसून आला आहे. गुजरातमध्ये १.८ टक्के लोकांनी नोटाचं बटन दाबलं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये ०.९ टक्के लोकांनी नोटाचं बटना दाबलं आहे.
 
गुजरातमध्ये नोटाचं प्रमाण हे भाजप आणि काँग्रेसल्या पडलेल्या मतांव्यतिरीक्त इतर कोणत्याही पक्षापेक्षा अधिक होतं. नोटा हे बटन लोकांना देण्यात आलेला तो अधिकार आहे ज्यामुळे निवडणुकीत उभ्या असलेल्या प्रत्येक उमेदवाराला लोकं नाकारु शकता.