अहमदाबाद : Patidar leader Hardik Patel, who recently quit Congress, joins BJP : गुजरातमधील पाटीदार नेता हार्दिक पटेल याने काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. (Gujarat Patidar leader Hardik Patel) गांधीनगर येथील भाजप मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व बहाल केले आहे. यादरम्यान पाटीदार आंदोलनात त्यांचे सहकारी असलेले अनेक नेते आणि त्यांचे समर्थकही भाजपमध्ये दाखल झाले.
गुजरातमधील पाटीदार नेता हार्दिक पटेल याने काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. गांधीनगर येथील भाजप मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले आहे. यादरम्यान पाटीदार आंदोलनात त्यांचे सहकारी असलेले अनेक नेते आणि त्यांचे समर्थकही भाजपमध्ये दाखल झाले.
पाटीदार नेता हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये नाराज होते. पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. काँग्रेच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पत्र पाठवून जोरदार हल्लाबोल केला होता. पक्षात काही किंमत नाही, असे त्यांनी या पत्रात म्हटले होते. त्यावेळी ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. अखेर आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हार्दिक पटेलनेही भाजपचा नेता होण्यापूर्वी लवकरच ट्विट केले होते. ज्यामध्ये त्याने लिहिले होते की, तो लहान सैनिक म्हणून काम करणार आहे. हार्दिक पटेलने गेल्या महिन्यात काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.
हार्दिकने गुरुवारी सकाळी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि समाजहिताच्या भावनांसह मी आजपासून एका नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेच्या उदात्त कार्यात मी एक लहान सैनिक म्हणून काम करेन.
राष्ट्रहित, प्रदेशहित, जनहित एवं समाज हित की भावनाओं के साथ आज से नए अध्याय का प्रारंभ करने जा रहा हूँ। भारत के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेन्द्र भाई मोदी जी के नेतृत्व में चल रहे राष्ट्र सेवा के भगीरथ कार्य में छोटा सा सिपाही बनकर काम करूँगा।
— Hardik Patel (@HardikPatel_) June 2, 2022
पदाच्या लालसेपोटी मी कुठेही कोणतीही मागणी केलेली नाही, असेही हार्दिक म्हणाला. दरम्यान, हार्दिक पटेल आगामी विधानसभा निवडणूकही लढवू शकतो, असे गुजरातच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यासाठी त्यांना सौराष्ट्रातील मोरबी किंवा अहमदाबाद जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी विरमगाम मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.