नवी दिल्ली : योगगुरू रामदेव बाबांची पतंजली आयुर्वेद लिमिटेड आता आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. आतापर्यंत खाद्यपदार्थ विकणारी पतंजली या पुढे टेक्सटाईल क्षेत्रात पदार्पण करत आहे. खास करून ही कंपनी येत्या काळात अंडरविअर आणि स्पोर्ट्सवियर बणवणार आहे.
भारतात विदेशी कंपन्यांनी व्यापलेली बाजारपेठ मुक्त करण्यासाठी पतंजली हे पाऊल टाकत आहे. रामदेव बाबांनी राजस्थान येथील अलवार येथे पतंजली ग्रामोद्योगाचे उद्घाटन करताना बुधवारी ही माहिती दिली. रामदेव बाबांनी सांगितले की, या पुढे पतंजली कपडा आणि टेक्स्टाईल मार्केटमध्ये उतरेल. या क्षेत्रातही ही कंपनी लवकरच विदेशी कंपन्यांना टक्कर देईल. तसेच, पतंजली अंडरवेअर आणि पारंपरीक स्पोर्ट्सवियर बनवेल असे रामदेव बाबा म्हणाले.
पतंजलीचे प्रवक्ते एस के तिजारावालाने सांगितले की, कंपनी स्वदेशी कपडे बनवेल. आमचे सुरूवातीचे लक्ष्य पाच हजार करोड रूपयांचे असेल. आम्ही लोकांना गुणवत्तापूर्ण कपडे मिळावेत यासाठी प्रयत्न करू. ज्यात जीन्स पासून, स्वेटरपर्यंतच्या कपड्यांचा समावेश असेल.