पतंजली देत आहे ऑनलाईन पैसे कमवण्याची संधी ; करा हे काम

पतंजली आयुर्वेद कंपनीने अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल, बिगबास्केट आणि ग्रोफर्स इत्यादी ई-कॉमर्स कंपन्यांसोबत करार केला.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 17, 2018, 04:14 PM IST
पतंजली देत आहे ऑनलाईन पैसे कमवण्याची संधी ; करा हे काम title=

नवी दिल्ली : पतंजली आयुर्वेद कंपनीने १६ जानेवारी मंगळवारी अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल, बिगबास्केट आणि ग्रोफर्स इत्यादी ई-कॉमर्स कंपन्यांसोबत करार केला. त्यामुळे आता पतंजलीचे प्रॉड्क्टस तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. यापूर्वी कंपनी patanjaliayurved.net वरून आपल्या प्रॉड्क्टसची ऑनलाईन विक्री करत होती. आता कंपनी ऑनलाईन विक्रीसोबत तुम्हालाही पैसे कमावण्यची संधी देत आहे. कंपनीसोबत जोडले गेल्यास तुम्ही महिन्याला हजारो रूपये कमवू शकता. 

ऑनलाईन सेलर बनण्याची संधी

तुम्ही देखील बिझनेस करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. पतंजलीसोबत जोडून तुम्ही ऑनलाईन सेलर बनू शकता. देशात पतंजलीचा कारभार तेजीने वाढत आहे. 

ऑथराइजेशन लेटर असणे गरजेचे आहे

ई-कॉमर्स साईट्सवर पतंजलीच्या नावाने सर्च केल्यास तुम्हाला पतंजली आयुर्वेदाचे सर्व प्रॉड्क्टस दिसतील. पतंजलीचे ऑनलाईन सेलर बनण्यासाठी पतंजलीचे ऑथराइजेशन लेटर असणे गरजेचे आहे. ते नसल्यास तुम्ही पतंजलीचे प्रॉडक्टस विकू शकणार नाही. पतंजलीच्या नावाखाली कोणतेही चुकीचे काम होऊ नये म्हणून कंपनीकडून ही खबरदारी बाळगण्यात आली आहे.

सेलर होण्यासाठी

पतंजली सेलर बनण्यासाठी पतंजली आयुर्वेदाच्या मार्केटींग टीमशी संपर्क साधा. पतंजलीचे देशभरात २ लाख सेलर आहेत. पण ती संख्या वाढून ५ लाख करण्याचा कंपनीचा मानस आहे. सेलर होण्यासाठी अर्ज करा. त्यासाठी तुमच्याकडे दुकान असायला हवे. पतंजलीच्या बेसिक गरजा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला सेलर बनण्याची संधी देण्यात येईल.

पतंजलीच्या ई-कॉमर्स कंपनीशी जोडल्यानंतर पतंजलीच्या विक्रीत वाढ होईल. तुम्ही देखील ऑनलाईन सेलर होऊ शकता. पतंजलीचे प्रॉड्क्ट ई-कॉमर्स वेवसाईटवर विकण्यासाठी तुम्हाला ई़-कॉमर्स प्लेटफॉर्मचे सेलर व्हावे लागेल. यासाठी त्यांच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करा.

 ई़-कॉमर्स साईट्सवर रजिस्ट्रेशन कसे कराल?

त्यासाठी तुमच्याकडे जीएसटी नंबर असायला हवा. त्याचबरोबर तुम्हाला पॅन आणि बॅंक अकाऊंट चे डिटेल्स द्यावे लागतील. त्यानंतर कंपनी तुमच्यासोबत एमओयू साईन करेल. करार झाल्यावर वेबसाईटवर तुम्ही तुमचे प्रॉडक्ट अपलोड करू शकता. वेरिफिकेश केल्यानंतर प्रॉडक्ट साईट्स वर दिसू लागतील. अधिकतर कंपन्या प्रॉडक्ट ऑनलाईन विकले गेल्यावर ग्राहकांकडून कमिशन घेतले जाते. ऑनलाईन पेमेंटमध्ये प्रॉडक्ट ग्राहकाला मिळाल्यानंतर सेलरच्या अकाऊंटला पैसे ट्रांसफर केले जातात.