केवळ 9 रूपयात आंतरराष्ट्रीय विमान प्रवास... 'या' कंपनीने दिली भन्नाट ऑफर

जर तूम्हीही परदेशात स्वस्तात जाण्याची स्वप्न पाहत असाल तर तूमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 

Updated: Aug 5, 2022, 06:03 PM IST
केवळ 9 रूपयात आंतरराष्ट्रीय विमान प्रवास... 'या' कंपनीने दिली भन्नाट ऑफर  title=

Plane travel offer: हल्ली विमान कंपन्याही प्रवाशांसाठी सिझननुसार नवीन ऑफर्स घेऊन येतात त्यातून प्रवाशांची प्रामुख्याने अशी मागणी असते की कधीतरी आपला परदेशी विमान प्रवासही स्वस्त व्हावा. याच मागणीच्या पार्श्वभुमीवर अशाच एका आंतरराष्ट्रीय विमान कंपनीने प्रवाशांसाठी एक खास ऑफर लॉन्च केली आहे. जर तूम्हीही परदेशात स्वस्तात जाण्याची स्वप्न पाहत असाल तर तूमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 

'व्हिएतजेट' (veitjet) ही विमान कंपनी चक्क तूम्हाला 9 रूपयात विमान प्रवास ऑफर करते आहे. या प्रवासादरम्यान तूम्ही भारत आणि व्हिएतनामचा प्रवास फक्त 9 रुपयांमध्ये करू शकता. आंतरराष्ट्रीय विमान कंपनी 'व्हिएतजेट'ने 9 रुपये इतक्या विमान तिकिटांची ऑफर आणली आहे. ज्याचे बुकिंग 4 ऑगस्टपासून सुरू झाले आहे. Eskbre या संकेतस्थळावर तूम्हाला या ऑफरची तपशीलवार माहिती मिळू शकेल. 

'व्हिएतजेट'ची ही ऑफर २६ ऑगस्टपर्यंत आहे. तुम्ही जर बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी तिकीट बुक केले तरच तुम्हाला ही संधी मिळेल. दिल्लीतील पत्रकार परिषदेत ही माहिती देताना विमान कंपनी व्हिएतजेटने सांगितले की, ''व्हिएतजेट भारत ते व्हिएतनाम प्रवासासाठी 30,000 प्रमोशनल तिकिटे प्रवाशांना देणार आहे. या तिकिटांची किमती 9  रु.पासून सुरू होतात. या ऑफर अंतर्गत 15 ऑगस्ट 2022 ते 26 मार्च 2023 पर्यंतच्या प्रवासासाठीचे बुकिंग 4 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट दरम्यान करता येणार आहे. एअरलाइन कंपनीच्या म्हणण्यानुसार 4 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी तिकीट बुकिंग केल्यास प्रवाशांना प्रमोशनल तिकीट मिळू शकते.

'व्हिएतजेट' कंपनीचे व्यावसायिक संचालक जय एल लिंगेश्वर यांनी माहिती दिली की, ''व्हिएटजेट भारत आणि व्हिएतनाम दरम्यान 17 मार्गांद्वारे take off करणार आहे. या प्रवासाचा मार्ग मुख्यत्वे दक्षिणपुर्व आशिया (बाली, बँकॉक, सिंगापूर, क्वालालंपूर), ईशान्य आशिया (सोल, बुसान, टोकियो, ओसाका, तैपेई) आणि आशिया पॅसिफिकपर्यंत राहील.''

काय काय पाहता येईल?

तूम्ही व्हिएतनाममधील 'दा नांग' या शहराला भेट देऊ शकतात आणि त्यानंतर 'होई एन', 'ह्यू इम्पीरियल', 'माय सोन अभयारण्य' आणि जगातील सर्वात मोठी गुहा 'सोन डूंग' यासह जवळपासच्या सर्व पर्यटन स्थळांना भेट देऊ शकतात.