नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. या अधिवेशानात एकूण २५ विधेयक मांडण्यात येणार आहेत. तसेच या अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेत गुजरात निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपांची झलक पाहायला मिळेल.
विरोधक नोटबंदी, जीएसटी, राफेल विमान खरेदी प्रकरण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकरी कर्जमाफी मुद्द्यावर आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर विरोधक आक्रमक होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारकडून संसदेत २५ विधेयक मांडण्यात येणार आहेत. यात खालील विधेयकांचा समावेश आहे.
1. वस्तू आणि सेवा कर (राज्यांना नुकसान भरपाई) अध्यादेश, 2017
2. मुस्लिम महिला (विवाह संरक्षणाच्या हक्क) विधेयक
3. दिवाळखोरी व दिवाळखोरीची संहिते (सुधारणा) अध्यादेश, 2017
4. भारतीय वन (सुधारणा) अध्यादेश, 2017
5. सरोगेट (नियमन) बिल, 2016
6. भ्रष्टाचार प्रतिबंध (दुरुस्ती) विधेयक, 2013
7. ट्रांसजेंडर व्यक्ती संरक्षण विधेयक (अधिकारांचे संरक्षण) बिल, 2016.
8. फायनान्स रिज्योलेशन अॅण्ड इंशोरन्स बिल
9. नागरिकता संशोधन विधेयक,
10. मोटार विधेयक
तसेच गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकीसाठी केंद्र सरकारने हिवाळी अधिवेशनात विलंब केला होता. हाहाी मुद्दा गाजण्याची शक्यता अधिकआहे.
तर दुसरीकडे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची रणनीती आखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले. यावेळी संसदेचे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.