नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी केंद्राचा १० सूत्री कार्यक्रम

१३ डिसेंबरला १० सूत्री दिशानिर्देश जारी करण्यात आले. नक्षल प्रभावीत राज्यांमध्ये याचे पालन करणे अनिवार्य आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 15, 2017, 08:42 AM IST
नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी केंद्राचा १० सूत्री कार्यक्रम  title=

नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील नक्षल प्रभावित १० राज्यामंध्ये लढण्यासाठी निर्देश जारी केले आहेत. छत्तीसगड येथील सुकमामध्ये झालेल्या चूकीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोर पाऊले उचलली जात आहेत. 

यावर्षी एप्रिलमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २५ जवान शहिद झाले होचे. रस्ता निर्माण सुरक्षेसाठी तैनात जवान जेवण करत असताना नक्षल्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता.

१३ डिसेंबरला १० सूत्री दिशानिर्देश जारी करण्यात आले. नक्षल प्रभावीत राज्यांमध्ये याचे पालन करणे अनिवार्य आहे. 

हे आहेत १० सुत्री दिशानिर्देश 

१) नक्षल ऑपरेशन दरम्यान २४*७ पूर्ण परिसर प्रभावाखाली घेण्यात यावा. 

२) चारही बाजूच्या तीक्ष्ण देखरेखीखाली होईल रोड ओपेनिंग ड्यूटी 

३) नक्षल्यांचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिंग ड्युटीवाल्या डॉग्जचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचे निर्देश 

४) ROP ड्युटी करणारे सर्व जवानांनी बीपी जॅकेट आणि हेलमेट घालावे.

५) UAV ने नक्षल्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवला जाईल. नक्षल्यांची रणनीती समजून जवान इकडून तिकडे हालचाल करतील.

६) ऑपरेशनवेळी अतिरिक्त सुरक्षा बल पाठविण्याची व्यवस्था अधिक मजबूत 

७) लोकल इंटेलिजन्स मजबूत करण्यासाठी सूचना

८) थर्मल इमेजर आणि नाइट विजन डिवाईस एका कंपनीने कमीत कमी 
४ जण असावेत. 

९) ऑपरेशन दरम्यान ३६० डिग्री कॅमेरा अनिवार्य 

१०)  के-९ डॉग प्रत्येक कंपनीत मुबलक संख्येत ठेवून ऑपरेशन केले जावे.