जीएसटी : मध्यरात्री १२ वाजता १७ टॅक्स आणि २३ सेस झाले रद्द

 संपूर्ण देशात आता एकच कर प्रणाली असणार आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याची घोषणा  मध्यरात्री १२  वाजता होणार आहे. प्रथम अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भाषण करत जीएसटीचे स्वागत केले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 1, 2017, 08:52 AM IST

नवी दिल्ली : संपूर्ण देशात आता एकच कर प्रणाली असणार आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याची घोषणा  मध्यरात्री १२  वाजता होणार आहे. प्रथम अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भाषण करत जीएसटीचे स्वागत केले.

 या कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची उपस्थिती असणार आहे. केंद्र सरकार मध्यरात्री १२ वाजता घंटा वाजवून जीएसटी लागू करण्याची घोषणा करणार आहे. त्यानंतर मध्यरात्री १२  वाजता १७  टॅक्स आणि २३सेस रद्द होणार आहेत.

या कार्यक्रमासाठी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, गायिका लता मंगेशकर, उद्योगपती रतन टाटा यांच्यासोबत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसहीत नावाजलेल्या कायदेतज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

जीएसटी लागू झाल्यानंतर भारत, युरोपियन युनियनहून मोठी बाजारपेठ म्हणून समोर येईल. अर्थतज्ज्ञांच्या मते, जीएसटीमुळे भारताची आर्थिक प्रगती होणार आहे.

GST Live :

- जीएसटी गुड आणि सिंपल टॅक्स , जीएसटी नव्या भारतातील करव्यवस्था आहे, जीएसटी डीजिटल इंडियांमधील करव्यवस्था आहे, जीएसटी ही आर्थिक सुधारणेचे प्रतीक - नरेंद्र मोदी
- नव्या व्यवस्थेबाबत अनेक शंका कुशंका जाहीर केल्या जात आहेत, पण चष्म्याचा नंबर बदलल्यावर जेवढा त्रास होतो तेवढाच त्रास होईल, मग सारे सुरळीत होईल - मोदी
- जीएसटीमुळे कच्चे बिल, पक्के बिल आदी खेळ संपुष्टात येईल - मोदी
- जीएसटीमुळे २० लाखांपर्यंत व्यवहार असलेल्या व्यापाऱ्यांना सूट मिळणार आहे - मोदी
- कर दहशत आणि इन्स्पेक्टर राजचा अनुभव आपण घेतला आहे, आता यातून व्यापाऱ्यांना मुक्तता मिळेल - मोदी

 - जीएसटी हे एका सरकारच्या प्रयत्नांचा परिणाम नाही तर सर्वाच्या मेहनतीचे फळ - मोदी
 - आज मध्यरात्री 125 कोटी देशवासीय या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होतील - मोदी
 - आज आपण देशाच्या पुढील वाटचालीची सुरुवात करण्याच्या दिशेने जात आहोत - मोदी
- जीएसटी उदघाटन समारंभ : जेटलींचे भाषण संपले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणसार सुरुवात
- जीएसटीमुळे भ्रष्टाचार आणि करचोरीला लगाम लागेल - जेटली
- जीएसटीतून मिळणारे अधिकचे उत्पन्न देशातील गरिबांच्या हितासाठी वापरता येतील - जेटली
- सध्या देशात असलेल्या करांपेक्षा अधिक बोजा पडू नये यासाठी खबरदारी घेतली - जेटली
- जीएसटीबाबतचे सर्व निर्णय एकमताने झाले - जेटली
- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी जीएसटीच्या प्रवासाचे साक्षीदार - जेटली
- असिम दासगुप्ता यांच्याकडून मला मिळाले जीएसटीबाबतचे प्राथमिक शिक्षण - जेटली
- १५ वर्षांपूर्वी झाली होती जीएसटीला लागू करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात - जेटली
- एक देश, एक टॅक्स आणि एकच बाजार असेल- अरुण जेटली
- मध्यरात्रीनंतर अर्थव्यवस्थेतील बदलाच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं जाईल - अरुण जेटली