मुंडे भगिनींनी दिल्लीत नितीन गडकरी यांची घेतली भेट; ही राजकीय चर्चा

महाराष्ट्र आणि दिल्लीतील राजकारणातील मोठी बातमी. 

Updated: Oct 20, 2021, 01:49 PM IST
मुंडे भगिनींनी दिल्लीत नितीन गडकरी यांची घेतली भेट; ही राजकीय चर्चा title=

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि दिल्लीतील राजकारणातील मोठी बातमी. भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) आणि खासदार प्रीतम मुंडे (pritam munde) या भगिनी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेतली आहे. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही दिल्लीत आहेत. त्यामुळे या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मुंडे भगिनींनी नितीन गडकरी यांची भेट घेतल्याने चर्चा होत आहे. दरम्यान, ही भेट बीड जिल्ह्यातील विकास कामासंदर्भात होती. त्यासाठी ही भेट घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुंडे भगिनींनी नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतल्याने चर्चा सुरु झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. या भेटीनंतर आता पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी गडकरी यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चा अधिक रंगली होती. मात्र, बीड जिल्ह्यातील विकास कामांसंदर्भात ही भेट असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली. त्याचवेळी त्या म्हणाल्या, अमित शाहांच्या मिटींगमध्ये मी नव्हते. मला काही सांगायचे असेल तर मी अमित शाह यांना भेटेन. 

बीड जिल्ह्यातील विकास कामा संदर्भात नितीन गडकरी यांची भेट घेतली. मतदारसंघातील कामांबाबत ही भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. गडकरी यांनी परळी जिल्ह्याला भरभरून दिले आहे. त्याबद्दल त्यांचे आभारही मानले. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. अमित शाह आणि फडणवीस भेटीवर त्यांनी भाष्य टाळले.