पाकिस्तानकडून नौशेरामध्ये फायरिंग, भारताचं चोख उत्तर

पाकिस्तानने जम्मू कश्मीरच्या नौशेरा सीमाभागात पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. नौशेराच्या केजी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून फायरिंग होत आहे. पाकिस्तानचं सैन्य छोटे-छोटे हत्यारं आणि ऑटोमॅटिक हत्यारांनी फायरिंग करत आहेत.

Updated: Jun 1, 2017, 10:29 AM IST
पाकिस्तानकडून नौशेरामध्ये फायरिंग, भारताचं चोख उत्तर title=

नवी दिल्ली : पाकिस्तानने जम्मू कश्मीरच्या नौशेरा सीमाभागात पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. नौशेराच्या केजी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून फायरिंग होत आहे. पाकिस्तानचं सैन्य छोटे-छोटे हत्यारं आणि ऑटोमॅटिक हत्यारांनी फायरिंग करत आहेत.

पाकिस्तानच्या या हरकतीला भारतीय जवानांनी देखील चोख उत्तर दिलं आहे. भारतीय सेनेकडून देखील पाकिस्तानला जशाच तसं उत्तर दिलं जात आहे. फायरिंग अजूनही सुरु असल्याची माहिती आहे.