पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच

गेल्या काही दिवसांपासून सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच आहे. 

Updated: Aug 12, 2017, 04:33 PM IST
पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच title=

श्रीनगर : पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच आहे. मेंधर सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. 

गेल्या काही दिवसांपासून सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच आहे.

शनिवारी रात्रीही उरीमधल्या कमालकोटे इथंही पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं होतं. 

दुसरीकडे कूपवाडा इथं दहशतवाद्यांनी लष्करी तळावर हल्ला केलाय. या हल्ल्यात एक जवान जखमी झालाय.