दिल्ली : तुम्ही पान खाण्याचे शौकीन असाल तर तुम्ही अनेक महागडे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पान नक्कीच खाल्ले असणार. चॉकलेट, आईस आणि फायरसारखे अनेक पान बाजारात उपलब्ध आहेत. परंतु आम्ही जे पान तुम्हाला दाखवत आहोत ना, ते पान तुम्ही कधीच खाल्ला नसणार. कारण हे साधंसुधं पान नाही, तर हे गोल्डन पान आहे. हो हे पान खऱ्या सोन्याची परख लावलेलं पान आहे. आता सोन्याचं पान म्हंटलं तर त्याची किंमतही तशीच असणार.
दिल्लीच्या सीपी म्हणजे कॅनॉट प्लेसमध्ये 'यमु की पंचायत' नावाचे एक पानचे दुकान आहे, जिथे हे सोनं लावले पान विकले जात आहे, हा पान बरेच लोक अनंदाने खात आहेत. या पानाची जर तुम्ही किंमत ऎकलात तर थक्कं व्हाल. हा पान 600 रुपयांना विकला जात आहे.
हे पान बनवतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या पानामध्ये तुम्ही पाहू शकता की, कोण कोणत्या वस्तू वापरल्या आहेत. त्यामध्ये चेरी, सुके खजूर, वेलची, गोड चटणीसारखे अनेक चविष्ट पदार्थ वापरले गेले आहेत. शेवटी त्यावर सोन्याचा मुलामा लावून चेरी ठेवून विकले जात आहेत.
या पानाची इतकी किंमत एकल्यानंतर तुम्ही हे पान विकत घ्याल का? यावर काही लोकांचे मजेदार कमेन्ट्स आले आहेत. तर काही लोक खूप जास्त किंमत ठेवली आहे असे म्हणत आहेत. एकाने असे लिहिले की, एवढ्या पैशात तर मी वर्षभर पान खाऊ शकतो. तर काही बोलत आहेत की ते पैसे मला द्या, मी त्या पैशात तुम्हाला डायमंन्ड पावडर देखील टाकून देईन.
लोकांचे काहीही म्हणणे असो, परंतु काही शौकिन लोक इतके महाग पान विकत देखील घेत आहेत. या मागे एकच वाक्य सुचतं ते म्हणजे "शौक बड़ी चीज है"