ऑक्सफर्ड युनिव्हसिटी भारताला परत करणार 500 वर्ष जुनी मुर्ती, पाहण्यासाठी मोजावे लागतात तब्बल 1800 रुपये, काय आहे खास?

Oxford University Returns 500 Year Old Stolen statue : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी भारताला 500 वर्ष जुनी पुतळा परत करणार आहे. 16 व्या शतकात तामिळनाडूतील एका मंदिरातून ती चोरीला गेली होती. मुर्तीला पाहण्यासाठी 1800 रुपये द्यावे लागतात.

सौरभ तळेकर | Updated: Jun 11, 2024, 09:31 PM IST
ऑक्सफर्ड युनिव्हसिटी भारताला परत करणार 500 वर्ष जुनी मुर्ती, पाहण्यासाठी मोजावे लागतात तब्बल 1800 रुपये, काय आहे खास? title=
Oxford University Returns 500 Year Old Stolen statue

Saint Tirumangai Alvar Stolen Indian Idol : तामिळनाडूतील एका मंदिरातून चोरी झालेली एक मुर्ती ब्रिटनची ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी (Oxford University) भारताला परत करणार आहे. 500 वर्षे जुनी ब्राँझची मूर्ती ही 16 व्या शतकातील असल्याची माहिती मिळाली आहे. संत तिरुमंगाई अल्वर (Saint Tirumangai Alvar) हे दक्षिण भारतातील १२व्या अलवर संतांपैकी शेवटचे संत होते. त्यांची ही मुर्ती होती. सध्या ही मुर्ती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या अश्मोलियन म्युझियममध्ये ठेवण्यात आली आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या मुर्तीला पाहण्यासाठी तब्बल 1800 रुपये मोजावे लागतात.

गेल्या काही दिवसांपासून या मुर्तीवरून वाद सुरू झाला होता. ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तांनी 11 मार्च 2024 रोजी ऑक्सफर्ड विद्यापीठाला ही मूर्ती तामिळनाडूतील मंदिरातील असल्याचा पुरावा दिला होता. त्यानंतर आता ऑक्सफर्ड विद्यापिठाने मुर्ती भारताला देण्यावर सहमती दर्शवली आहे. ब्रिटिश मीडिया द गार्डियनच्या रिपोर्टनुसार, ही मूर्ती सुमारे 1 मीटर उंच आहे. यामध्ये संत थिरुमंगाई अल्वार यांच्या हातात तलवार आणि ढाल आहे.

संत थिरुमंगाई अल्वर यांची मुर्ती चोरीला गेली होती याबाबत कोणातीही माहिती आम्हाला नव्हती, असं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या ॲशमोलियन म्युझियमच्या वतीने सांगण्यात आलंय. 1960 च्या सुमारास ही मुर्ती चोरी झाल्याचा संशय आहे. तमिळनाडूच्या मंदिरात 1957 चे तेच कांस्य सापडले, ज्याचा वापर ही मूर्ती बनवण्यासाठी करण्यात आला होता. संत थिरुमंगाई अलवर यांचा हा पुतळा 1 मीटर उंच आहे.

कोण होते संत थिरुमंगाई अल्वर?

चोल देशाचे तिसरे अल्वर कालियान किंवा तिरुमंगाई मन्नान होते. ते सर्व वैष्णव संतांमध्ये अग्रगण्य होते आणि त्यांनी विष्णू मंदिरांवर सर्वाधिक स्तोत्रे सोडली आहेत. तुरुमंगाई अल्वर यांचा जन्म तंजोर जिल्ह्यातील तिरुक्कुरायलूर येथे कल्ला कुटुंबात झाला. त्याच्या पालकांनी त्यांचे नाव कालियान किंवा कालिकंरी ठेवले. असे दिसते की त्याने चोल राजांच्या अधिपत्याखाली जनरलिसिमोचे पद भूषवले होते आणि ते एका छोट्या जिल्ह्याचा सरंजामदार होते.