मुंबई : जर बसून बसून तुम्हाला कंटाळ येत असेल आणि काही तरी मनोरंजन किंवा मग टाईमपास म्हणून करायचे असेल तर चला एक Optical Illusion पाहूया. कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याची आपली पद्धत बर्याच अंशी आपले व्यक्तिमत्व सांगते. उदाहरणार्थ, आपण एखादी गोष्ट त्याच्या तपशिलात किंवा वरवर पाहतो किंवा एखाद्या गोष्टीमध्ये आपण प्रथम काय लक्षात घेतो. या गोष्टी आपले व्यक्तिमत्व प्रकट करतात. त्याच वेळी, आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत हे देखील दर्शवते. चला तर तुमची परीक्षा घेऊया.
तुम्हाला चार ग्लास ग्लास दिसत आहेत. त्यातील प्रत्येक ग्लासमध्ये पाणी भरलेल आहे, चारही ग्लासमध्ये ते पाणी समान असल्याचे दिसते. एका ग्लासमध्ये कात्री आहे, दुसऱ्या ग्लासमध्ये पिन, तिसऱ्या ग्लासमध्ये शार्पनर आणि चौथ्या ग्लासमध्ये हातात घालायचे घड्याळ. आता तुम्हाला यापैकी कोणत्या ग्लासात जास्त पाणी आहे ते ओळखावे लागेल. (Optical Illusion which glass has more water)
प्रत्येक ग्लासमध्ये पाण्याची पातळी समान दिसते, परंतु प्रत्यक्षात तसं नाही. थोडा विचार केला तर कळेल की कोणत्या ग्लासात सर्वाधिक पाणी आहे. या फोटोकडे काळजीपूर्वक पाहा आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला अजून उत्तर मिळालं नसेल, तर चला जाणून घेऊया कोणत्या ग्लासमध्ये पाण्याची पातळी सर्वात जास्त आहे? उत्तर आहे नंबर दोनला असलेला ग्लास. चला जाणून घेऊया कसं..
आणखी वाचा : IAS Tina Dabi नी स्टेजवर जाताच काय केलं? प्रेक्षकांनी पाहताच...
जड वस्तू जास्त जागा घेईल आणि हलकी वस्तू कमी जागा घेईल हे एक वैज्ञानिक सत्य आहे तसेच एक सामान्य गोष्ट आहे. नीट पाहिल्यास, दोन नंबरच्या ग्लासमध्ये ठेवलेली पिन ही इतरांच्या तुलनेत सर्वात हलकी गोष्ट आहे, त्यामुळे या काचेमध्ये ठेवलेली वस्तू कमीत कमी जागा व्यापते. यावरून ग्लास क्रमांक दोनमधील पाण्याची पातळी सर्वात जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.