Optical Illusion: या मानवी चेहऱ्यात लपलेत तीन मुली, चला 20 सेकंदात शोधून दाखवा

ऑप्टिकल इल्यूजन फोटो बुद्धीचा कस लावणारे असतात. या फोटोत लपलेलं रहस्य शोधून काढणं एक चॅलेंज असतं. 

Updated: Sep 4, 2022, 02:52 PM IST
Optical Illusion: या मानवी चेहऱ्यात लपलेत तीन मुली, चला 20 सेकंदात शोधून दाखवा title=

Optical Illusion Spot 3 Hidden Faces: सोशल मीडियावर एकाहून एक असे सरस ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. ऑप्टिकल इल्यूजन फोटो बुद्धीचा कस लावणारे असतात. या फोटोत लपलेलं रहस्य शोधून काढणं एक चॅलेंज असतं. त्यामुळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो दिसला की दिसला त्यातील कोड सोडवण्यात बुद्धीचा कस लागतो. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोतील मानवी चेहऱ्यात दडलेल्या तीन मुलींना शोधून काढायचं आहे. या फोटोतील तीन मुलींना शोधणं कठीण आहे. या फोटोतील मुली शोधण्यापूर्वी घड्याळात 20 सेकंद सेट करा आणि पटकन शोधून दाखवा.

हा फोटो अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे की तुमचा लक्ष वारंवार खंडित होईल. पण तुम्हाला प्रयत्न करत राहावे लागतील. हे कोडं सोडवताना मोठं मोठ्या विद्वानांना देखील घाम फुटू शकतो, असं म्हणायला हरकत नाही. जर तुम्हाला या व्यक्तीच्या मुलींचे तीनही चेहरे सापडले नाहीत, तर खालील फोटोमध्ये योग्य उत्तर पाहा.

 

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की दिलेल्या वेळेत फार कमी लोकांना तीन मुलींचे चेहरे सापडले आहेत. जर तुम्ही देखील त्यांच्यापैकी एक असाल, तर अभिनंदन तुम्ही सुद्धा बुद्धीमान लोकांच्या यादीत सामील झाला आहात. लोकांना हा ऑप्टिकल इल्युजन खूप आवडला आहे.