तुमच्या रेशनचा हिशेब थेट मोबाईलमध्ये; Mera Ration App लॉन्च - जाणून घ्या फायदे

देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी एकूण 32 राज्यात वन नेशन वन राशन लागू आहे. देशातील एकूण लोकसंख्ये पैकी 86 टक्के लोकं या योजनेंतर्गत येतात.

Updated: Mar 15, 2021, 03:57 PM IST
तुमच्या रेशनचा हिशेब थेट मोबाईलमध्ये; Mera Ration App लॉन्च - जाणून घ्या फायदे title=

मुंबई : देशात आता रेशन मिळविणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने (Ministry of Food and Public Distribution) वन नेशन वन राशन कार्ड (One Nation One Ration Card) अंतर्गत मेरा रेशन ऍप (Mera Ration App) लॉन्च केला आहे. सर्व लाभार्थ्यांना या अ‍ॅपचा लाभ मिळणार आहे. देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी एकूण 32 राज्यात वन नेशन वन राशन लागू आहे. देशातील एकूण लोकसंख्ये पैकी 86 टक्के लोकं या योजनेंतर्गत येतात.

23.26 कोटी लाभार्थींना मिळणार फायदा (23.26 crore beneficiaries have taken advantage of the scheme)
या योजनेअंतर्गत 23.26 कोटी लाभार्थियांना याचा फायदा मिळला आहे. यात 4 राज्य - आसाम, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ आणि दिल्लीच्या लोकांना फायदा मिळाला नाही.

जेव्हा कोरोना महामारी भारतात आली, तेव्हा फक्त 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या योजनेअंतर्गत येत होते. परंतु डिसेंबर 2020 नंतर या योजनेअंतर्गत 32 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश झाला.

Mera Ration App चे फायदे (Benefits of Mera Ration App)
ही योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात मोहीम राबविली आणि एक राष्ट्रीय हेल्पलाइन नंबरही सुरू केला. मेरा राशन ऍप वरुन तुम्ही बरेच फायदे घेऊ शकता. या अंतर्गत तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधा मिळतील

काय सुविधा उपलब्ध आहेत?

1. आपल्या जवळची योग्य किंमत देणारी दुकाने जाणून घेऊ शकता
2. अन्नाची पात्रता तपासू शकतो
3. तुमचा  रेशन दुकानदारासोबतचा शेवटचा व्यवहार पाहू शकता.
4. आधारवरून मालाची स्थिती पाहू शकता
5. स्थलांतरित मजूर त्यांच्या स्थलांतर तपशील म्हणजेच, त्यांचे माइग्रेशन डीटेल्स ऍपद्वारे नोंदणी करू शकतात.
6. Mera Ration App सध्या इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध आहे

येत्या काही महिन्यांत यात अनेक फीचर्स समाविष्ट होतील आणि ते 14 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होतील.