Funny Video: AC एक आणि थंडवा दोन रुममध्ये, देसी जुगाड पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

Indian Desi Jugaad Funny Video: भारतीय आणि देसी जुगाड यांची सोशल मीडियावर कायमच चर्चा असते. एकापेक्षा एक सरस असे देसी जुगाडचे (Desi Jugaad) व्हिडीओ व्हायरल होत असतात. कमी खर्चात जास्त फायदा म्हणजेच देसी जुगाड असं समीकरण असतं. काही जुगाड पाहिल्यानंतर पोट धरून हसावं लागतं. 

Updated: Oct 31, 2022, 08:04 PM IST
Funny Video: AC एक आणि थंडवा दोन रुममध्ये, देसी जुगाड पाहून तुम्हीही पोट धरून हसाल title=

Indian Desi Jugaad Funny Video: भारतीय आणि देसी जुगाड यांची सोशल मीडियावर कायमच चर्चा असते. एकापेक्षा एक सरस असे देसी जुगाडचे (Desi Jugaad) व्हिडीओ व्हायरल होत असतात. कमी खर्चात जास्त फायदा म्हणजेच देसी जुगाड असं समीकरण असतं. काही जुगाड पाहिल्यानंतर पोट धरून हसावं लागतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video On Social Media) वेगाने व्हायरल होत आहे. याच महागडा एसी दोन खोल्यांमध्ये थंडावा देत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये इतरही जुगाड असलेले फोटो आहेत. मात्र नेटकऱ्यांना एसी लावण्याची कल्पना सर्वात जास्त भावली. आतापर्यंत 12 मिलियनहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. 

हा व्हिडीओ Mr. Factopiya नावाच्या युट्यूब अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की दोन खोल्यांच्या कॉमन भिंतीला एक मोठं छिद्र पाडलं आहे. आणि एसीचा थंडावा दोन्ही खोल्यांमध्ये अनुभवला जात आहे. हा जुगाड नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे.

या व्यतिरिक्त या व्हिडीओमध्ये एका घोडागाडीला कारसारखा लूक दिल्याचं दिसत आहे. घोडा कार ओढत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर पुढच्या फ्रेममध्ये एक सायकल रिक्षावाला दिसत आहे. त्यात एक महिला बसली असून तिला सर्व बाजूंना झाकलं आहे. त्यात तिने छत्रीही घेतली आहे. त्यानंतर एका गाठोड्याला कुलूप लावल्याचं दिसत आहे आणि शेवटी एक बाटल्यांचं घर दिसत आहे.