हनिमूनच्या रात्री नवऱ्यानं नको तेच केलं आणि बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली

लग्नाआधी लोक आपल्या जोडीदाराबद्दल सर्व काही शोधून काढतात. पण असे असूनही असे अनेक लोक आहेत ज्यांना लग्नानंतरच आपल्या जोडीदाराची खरी ओळख होते.

Bollywood Life | Updated: Jul 20, 2022, 08:19 PM IST
हनिमूनच्या रात्री नवऱ्यानं नको तेच केलं आणि बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली title=

मुंबई : कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात लग्न खूप महत्वाचं असतं, कारण यानंतर त्याचं आयुष्य पूर्णच बदलतं. विशेषता महिलांवर याचा खूप मोठा परिणाम होतो कारण त्यांच्या आजूबाजूच्या सर्वच गोष्टी बदलतात. कारण त्यांच्यावर घर सांभाळण्याची जबाबदारी देखील पडते. अशा परिस्थितीत, लग्न करण्यापूर्वी, समोरच्या व्यक्तीबद्दलच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. मात्र, आता भारतातही लव्ह मॅरेजचा ट्रेंड खूप वाढला आहे आणि लग्नाआधी लोक आपल्या जोडीदाराबद्दल सर्व काही शोधून काढतात. असे असूनही, अनेक लोक आहेत ज्यांना लग्नानंतरच आपल्या जोडीदाराची खरी ओळख होते.

आम्ही तुम्हाला अशाच एका प्रकरणाबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या महिलेला आपल्या नवऱ्याबाबत एक गोष्ट ठावूक नव्हती. जी तिला लग्नानंतर कळाली आणि त्यामुळे तिच्या आयुष्यात मोठी उलाढाल झाली.

महिलेचे म्हणणे आहे की, तिच्या नवऱ्याला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत राहायचे आहे, त्यामुळे तिच्या नवऱ्याचे वागणे तिच्यासोबत कधीच चांगले राहिले नाही.

आता हे प्रकरण नक्की आहे तरी काय? जाणून घ्या

26 वर्षीय महिलेने सांगितले की, ''लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या नवऱ्याने मला त्याच्या गर्लफ्रेंडचा फोटो दाखवला. तो म्हणाला की, तो खऱ्या अर्थाने त्याच्या गर्लफ्रेंडला त्याची पत्नी मानतो. गर्लफ्रेंडसोबतच्या संबंधामुळे तो माझ्याशी खूप गैरवर्तन करतो.''

महिलेने पुढे सांगितले, ''तीन वर्षांपूर्वी माझे लग्न ठरले होते. लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या नवऱ्याने मला एका मुलीचा फोटो दाखवला जिला तो त्याची गर्लफ्रेंड म्हणत होता. यामुळे आमच्यात खूप भांडण झाले आणि माझ्या नवऱ्याने मला खूप मारले.

महिला म्हणाली, 'माझे रडणे ऐकून माझा दीर तेथे आला आणि त्याने मला माझ्या नवऱ्यापासून वाचवले.'

महिलेने सांगितले की, ''लग्नानंतर काही दिवसांनी मी माझ्या माहेरी आले असता, तेव्हा माझ्या सासरच्या लोकांनी मला परत येण्यास नकार दिला. दरम्यान, माझ्या सासरच्या घरी एक अपघात झाला. माझ्या पतीच्या भावाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मी लगेचच सासरच्या घरी गेले. सासरच्या घरी गेल्यावर माझ्या आणि माझ्या नवऱ्यामध्ये पुन्हा त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल खूप भांडण झाले आणि मी परत माझ्या घरी परतले."

काही दिवसांनी माझा नवरा नशेच्या अवस्थेत माझ्या घरी आला आणि तिथे त्याने खूप गोंधळ घातला. यामुळे आम्हाला पोलिसांना बोलवावे लागले.

पोलिसांनी दोघांमध्ये समझोता केला आणि दोघे पुन्हा एकत्र राहू लागले. महिला म्हणाली, ''आमच्या नात्यात काहीच सुधारणा झाली नाही. आमची रोज भांडणे व्हायची. त्यामुळे मी माझ्या घरी आले आणि त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली.''
 
वरील सगळं प्रकरण पाहाता, याला एक उदाहरण म्हणून घ्या आणि लग्नापूर्वी नवऱ्याबद्दल काही गोष्टी जाणून घ्या, कारण हे खूप गरजेचे आहे, जेणेकरून नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.