#OmicronVarient चा भारतात प्रवेश, सोशल मीडियावर मीम्सचा कहर

देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराच्या दोन रुग्णांची पुष्टी झाली आहे. याबाबत इंटरनेटवर एकापेक्षा एक मीम्स व्हायरल होत आहेत. त्याचवेळी ट्विटरवर #OmicronVariant ट्रेंड करत आहे.

Updated: Dec 2, 2021, 07:13 PM IST
#OmicronVarient चा भारतात प्रवेश, सोशल मीडियावर मीम्सचा कहर title=

Omicron In india : ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत संपूर्ण जगात दहशतीचे वातावरण असताना भारतात देखील याची लागण झालेले 2 रुग्ण आढळले आहेत. या विषाणूला आळा घालण्यासाठी अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरही बंदी घातली आहे, मात्र तरीही त्याचा कहर थांबण्याचे नाव घेत नाहीये.

कर्नाटकात आलेल्या 2 रुग्णांमध्ये हा नवा व्हेरिएंट आढळून आलाय. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने याला दुजोरा दिलाय. ओमिक्रॉन भारतात दाखल झाल्यानंतर आता सोशल मीडियावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्यायेत. सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आलाय.

आतापर्यंत 29 देशांमध्‍ये ओमिक्रॉन वेरिएंटने संक्रमित रूग्णांची ओळख पटली आहे आणि डब्ल्यूएचओने या प्रकाराला चिंतेच्‍या श्रेणीत ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेत या प्रकाराचा संसर्ग झालेल्या रुग्णाची प्रथम ओळख झाली. ज्यानंतर भारतासह संपूर्ण जग यावेळी कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत सतर्क झाले आहे. दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, हाँगकाँग, बेल्जियम आणि इस्रायलमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नवीन प्रकारांनी निर्बंधांचा कालावधी परत आणला आहे.