OMG! तरुणानं केलेलं हे धाडस कोणीच करू शकत नाही, पाहा व्हिडीओ

हातात हात आणि तरुणाचा मगरीसोबत रोमँटिक कपल डान्स, व्हिडीओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Updated: May 30, 2022, 05:31 PM IST
OMG! तरुणानं केलेलं हे धाडस कोणीच करू शकत नाही, पाहा व्हिडीओ  title=

मुंबई : सोशल मीडियावर शिकारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता एक अजब व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहताच क्षणी तुम्हाला हसू येईल पण असंही वाटेल की या तरुणाने जे धाडस केलं ते दुसरा कोणी करू शकणार नाही. हैराण करणारा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. 

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला एक क्षण आश्चर्याचा धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये पाहू शकता एक तरुण पाण्यात आले. हा तरुण मगरीसोबत रोमाँटिक डान्स करत आहे. मगरीचे दोन पाय हातात घेऊन रोमाँटिक डान्स करत आहे. याचं धाडस एवढं जबरदस्त आहे की पाहणारेही हैराण झाले. 

आपण सर्वांनी कधी ना कधी मगरी पाहिलीच असेल. इंटरनेटवर मगरीच्या हल्ल्याचे व्हिडिओही पाहायला मिळतात. अनेकदा लोकांना मगरींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. पण हा व्हिडीओ पाहून तुमची झोप उडेल. चक्क माणसाने मगरीसोबत डान्स केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

wonderdixe नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. मगरीने हल्ला केला की डान्स करायचं या तरुणाचं भूत चांगलंच उतरेल असं युजर्स म्हणाले आहेत. काही लोकांनी ही मागर पाळलेली असावी असंही भाकीत केलं आहे. पण हा व्हिडीओ पाहून युजर्सची चांगलीच झोप उडाली आहे. अशा प्रकारचं धाडस तुम्ही करू नका. 

हा व्हिडीओ कुठला आहे याची माहिती मिळू शकली नाही. झी 24 तास या व्हिडीओची कोणतीही खातरजमा करत नाही. त्यामुळे तुम्ही असे धाडस करणं टाळा.