कामावरच पोहोचायला उशीर झाला आणि बॉसची सटकली, कर्मचाऱ्याने विचारही केला नसेल अशी मिळाली शिक्षा

कर्मचाऱ्याला काढून टाकण्याची अनेक कारणे आहेत. काहींना काम न केल्यानं, तर काहींना 'कॉस्ट-कटिंग'मुळे कंपनीकडून काढून टाकले जाते.

Updated: Aug 5, 2022, 03:45 PM IST
कामावरच पोहोचायला उशीर झाला आणि बॉसची सटकली, कर्मचाऱ्याने विचारही केला नसेल अशी मिळाली शिक्षा title=

नवी दिल्ली : कधी-कधी कामाच्या ठिकाणी उशीर होतो. कधी ट्राफिकमुळे किंवा कधी काही अडचण आल्याने वेळेत पोहोचणं शक्य होत नाही. अशावेळी आपल्या बॉसनं समजून घेणं अपेक्षित असतं. मात्र तसं जर झालं नाही तर काय होऊ शकतं याचा विचार न केलेलाच बरा. 7 वर्षांत पहिल्यांदा उशिरा पोहोचलेल्या कर्मचाऱ्याला बॉसने वाईट शिक्षा दिली. 

कर्मचाऱ्याला काढून टाकण्याची अनेक कारणे आहेत. काहींना काम न केल्यानं, तर काहींना 'कॉस्ट-कटिंग'मुळे कंपनीकडून काढून टाकले जाते. काही कंपन्यांसाठी शिस्त खूप महत्त्वाची असते. कामावर उशिरा पोहोचणे हे काही कंपन्यांसाठी डील ब्रेकर आहे. उशिरा येणाऱ्याचा पगारही कापल्याचे अनेक प्रसंग समोर आले आहेत. 

एका कर्मचाऱ्याला 20 मिनिटे उशीर झाल्याने त्याला थेट नोकरीवरून काढण्यात आलं आहे. या व्यक्तीनं सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे. 7 वर्षात पहिल्यांदाच ही व्यक्ती 20 मिनिटं उशिरा आली. त्यामुळे चक्क बॉसने कामावरून काढण्याचा निर्णय घेतला. ही सगळी घटना त्याने सोशल मीडियावर शेअर केली. 

या व्यक्तीने सांगितलं की बॉसच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी सहकर्मचाऱ्यांनी देखील उशिरा येण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत काढलेल्या कर्मचाऱ्याला कामावर घेत नाही तोपर्यंत उशिरा येण्याचं इतर कर्मचाऱ्यांनी जाहीर केलं.  

'7+ वर्षात कधीही उशीर न करणारा सहकारी पहिल्यांदा उशीरा आल्यावर नोकरीवरून काढला जातो.' Reddit वर शेअर केल्यापासून पोस्टला 78,000 हून अधिक लाईक मिळाले आहेत. याशिवाय, अनेक युजर्सनी कंपनीच्या कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे.

या पोस्टवर युजर्सनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एकाने म्हटलं की बॉस नोकरीवरून काढण्याचं कारण शोधत असावा. दुसरा म्हणाला की काहीतरी मोठी अडचण असावी, तिसरा म्हणाला की काढणं गरजेचं असावं कमी पगारात दुसरे लोक भरायचे असावेत. अशा अनेक कमेंट्स सोशल मीडियावर येत आहेत. ही घटना नेमकी कुठली आहे आणि कंपनी कोणती होती याची माहिती मिळू शकली नाही.