आई तू इतकी निष्ठूर का झालीस, माझी चूक तरी काय होती! मन हेलावणारी घटना

पोटच्या गोळ्याला 4 वर्ष जपलं, आजारपणाला कंटाळून चौथ्या मजल्यावरुन फेकलं

Updated: Aug 5, 2022, 03:42 PM IST
आई तू इतकी निष्ठूर का झालीस, माझी चूक तरी काय होती! मन हेलावणारी घटना title=

Crime News : आपल्या पोटच्या मुलांसाठी आई काहीही करायला तयार असते, वेळेप्रसंगी आपल्या जीवाचीही बाजी लावायलाही मागे पुढे पाहत नाही. पण आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली. आपल्या मुलीच्या आजारपणाला कंटाळून एका आईने आपल्या चार वर्षांच्या मुलीला चक्क चौथ्या मजल्यावरुन खाली फेकलं.

मुलगी मूकबधीर असल्यानं तिच्या या आजाराला कंटाळून आईनं पोटच्या चिमुकलीला खाली फेकलं. त्यानंतर आई स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला वाचवण्यात आलं. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालाय. मुलीला खाली फेकणारी आई डेंटल सर्जन आहे. 

सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. मृत मुलीचे वडिल हे आयटी क्षेत्रात आहेत, तर आई सुषमा डेंटल सर्जन आहे. पण सध्या ती नोकरी करत नव्हती. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार त्यांची मुलगी मूकबधीर होती. त्यामुळे सुषमा नैराश्यात होती. या गोष्टीचा तिच्या मनावर प्रचंड परिणाम झाला होता.

मुलीची अवस्था पहावत नसल्याने सुषमाने मुलीला संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तीने मुलीला चौथ्या मजल्यावरुन खाली फेकलं. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.