Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज आर्थिक वर्ष 2023 -24 साठीचं (Financial Year 2023 -24) बजेट मांडलं. या अर्थसंकल्पामधून वेगवेगळ्या क्षेत्रासाठी दरदूर करण्यात आली आहे. निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पाचं (Budget 2023) वाचत केलं. त्यावेळी त्यांच्याकडून शब्द उच्चारत असताना एक चूक झाली. त्यानंतर संपूर्ण सभागृह खदाखदा हसल्याचं दिसून आलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासह अनेकांना हसू आवरलं नाही. (Old political vehicles sorry polluting nirmala sitharaman slip of tongue in Budget speech 2023 marathi news)
केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्पाचं (Union Budget 2023) वाचत करत होत्या. त्यावेळी वाहनांच्या धोरणावर बोलत असताना सीतारमण यांनी 'ओल्ड पॉलिटिकल व्हेहिकल' असा (Old Political Vehicle) शब्दप्रयोग केला. त्यावेळी त्यांना 'ओल्ड पॉल्युटेड व्हेहिकल' असं (Old Polluted Vehicle) म्हणयचं होतं. सीतारमण यांच्या वाक्यानंतर अनेकांना हसू आवरलं नाही. संसदेत एकच हशा पिकला. त्यानंतर सीतारमण यांना लगेच आपली चूक लक्षात आली.
सभागृह हसत (Parliment Hustle) असताना त्यांनीही हसत सॉरी (Sorry) म्हटलं आणि आपली चूक दुरूस्त केली. क लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद... असं म्हणत त्यांनी हात वर करून चूक मान्य केली. त्यावेळी नितिन गडकरींना (nitin gadkari laugh) देखील हसू आवरलं नाही. तर काही नेत्यांना नेमकं काय झालं, हेच सुधरलं नाही.
दरम्यान, सॉरी म्हटल्यानंतर त्यांनी ओल्ड पॉल्युटेड व्हेहिकल यावर भर देत पुढील अर्थसंक्लप (Union Budget 2023) वाचण्यास सुरूवात केली. जुनी वाहनं भंगारात काढण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यावर बोलत असताना हा गोंधळ उडाला. मात्र, यानंतर सभागृहाचं (Parliment) वातावरण हसकं फुलकं झाल्याचं पहायला मिळालं.