वृद्ध पत्नीचा सायकलीवरुन मृतदेह नेताना खाली कोसळला, फोटो व्हायरल

कोरोना संक्रमित लोकांची संख्या इतकी वाढली आहे की, उपचारासाठी लागणाऱ्या प्राथमिक गोष्टींचाही अभाव निर्माण होऊ लागला आहे.

Updated: Apr 29, 2021, 07:18 PM IST
वृद्ध पत्नीचा सायकलीवरुन मृतदेह नेताना खाली कोसळला, फोटो व्हायरल title=

जौनपूर : कोरोना संक्रमित लोकांची संख्या इतकी वाढली आहे की, उपचारासाठी लागणाऱ्या प्राथमिक गोष्टींचाही अभाव निर्माण होऊ लागला आहे. ज्यामुळे दररोज काही ना काही धक्कादायक प्रकार आपल्याला ऐकायला मिळतात. उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत, यामध्ये एका फोटोत वृद्ध माणूस एका महिलेचा मृतदेह सायकलवरुन घेऊन जात आहे. तर दुसर्‍या फोटोमध्ये त्या महिलेचा मृतदेह सायकल खाली पडला आहे, ज्यामुळे तो वृद्ध माणूस उदास होऊन, कपाळाला हात लावून त्या मृतदेहापासून थोड्या अंतरावर बसला आहे.

टिळकधारी यांच्या पत्नीचे सरकारी रुग्णालयात कोविडमुळे निधन झाले आहे. त्यांचा पत्नीचा मृतदेह गावातील त्यांच्या घरी रुग्णवाहिकेतून सोडण्यात आला, परंतु कोरोनामुळे गावकऱ्यांनी अंत्यविधीला विरोध केला. लाचार होऊन टिळकधारी यांनी पत्नीच्या मृतदेहाला सायकलवर ठेवले आणि एकट्याने सायकल चालवत नेण्यास सुरवात केली. पण वाटेत संतुलन बिघडल्याने त्यांच्या पत्नीचा मृतदेह सायकलवरून खाली पडला आणि त्यांची सायकलही उलटली.

तेथून जात असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने त्यांना पाहिले. त्यांनी त्या भागातील सीओला माहिती दिली. सीओने टिळकधारी यांच्या पत्नीच्या अंत्यविधीची व्यवस्था केली आणि एका मुस्लिम तरुणांच्या मदतीने तिचे अंत्यसंस्कार केले.

ऑक्सिजन आणि इंजेक्शनच्या अभावामुळे लोकांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. ऑक्सिजन आणि इंजेक्शनसाठी लोकं लांबच लांब रांगा लावत आहेत. तर कुठे लोकं रुग्णांच्या जीवनासाठी प्रार्थना करत आहेत. यापूर्वी ही अशा प्रकारचे आणखी एक घटना यूपीमधून  समोर आली होती. यामध्ये कोविड संक्रमीत पतीला वाचवण्यासाठी एक पत्नी आपल्या तोंडातून पतीला श्वास देण्याचा प्रयत्न करत होती. ही घटनाही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तिच्या नवऱ्याला श्वास घेण्यात त्रास होत होता आणि ऑक्सिजनचे व्यवस्थापन होत नव्हते, म्हणून पत्नीने आपल्या श्वासाने पतीचा श्वास देण्याचा प्रयत्न केला, परंतु ती त्याला वाचविण्यात अपयशी ठरली. मिळालेल्या माहितीनुसार ही महिला आग्रा येथील खासगी रुग्णालयात गेली होती, पण तिचा पती कोविड पॉझिटिव्ह असल्याचा रीपोर्ट तिच्याकडे नव्हता ज्यामुळे रुग्णालयाने त्याला भरती करण्यास नकार दिला.