Ola Electric Scooter Scams : इंटरनेटच्या माध्यमातून टेक्नॉलॉजि अधिक प्रगत होतेय. जग झपाट्याने बदलतंय. मात्र ज्या वेगाने इंटरनेची क्रांती होतेय त्या वेगाने नागरिकांना त्याबाबत माहिती मिळत नाही. याचाच फायदा गुन्हेगार करतात आणि तुम्हाला लुटण्याचा प्रयत्न होतो, तुमची बँक खाती रिकामी होतात. ई-मेल स्कॅम, बँकिंग स्कॅम, लॉटरी स्कॅम, KYC स्कॅम, फिशिंग वेबसाईट्स अशा विविध माध्यमांतून सायबर गुन्हे घडवले जातात. या गुन्ह्यांची पद्धतही एवढ्या फास्ट बदलते की लोकांना त्याबाबत समजण्यास उशीर होतो. लोकं अशा फसवणुकीला सहज बळी पडतात. सायबर गुन्हेगार किती स्मार्ट असतात याचं एक नवीन उदाहरण आता समोर आलं आहे. OLA Electric Scooter ची एक डुप्लिकेट वेबसाईट बनवून एक दोन नव्हे तर तब्बल 1000 लोकांना गंडा (Cyber Scam) घालण्यात आला आहे.
सायबर पोलिसांमध्ये याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर ही गोष्ट उघडकीस आली आणि हा मोठा स्कॅम असल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी तब्बल 20 आरोपींना अटक केली आहे. दरम्यान ज्यांना गंडा घालण्यात आला आहे अशांना नुकसान भरपाई मिळाली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सायबर गुन्हेगार साधारतः थेट रोकडीत किंवा इतर क्लिष्ट माध्यमांतून गुन्हा घडवून आणतात. प्राथमिक तपासामध्ये बंगळुरूच्या दोघांनी मिळून हा गोरखधंदा सुरु केल्याचं समजतं.
प्राथमिक तपासामध्ये काही महत्त्वाचे सुगावे समोर आले आहेत. यामध्ये ज्यांना ओला स्कुटर ( Ola Scoter Scam) विकत घ्याची आहे अशांना टार्गेट केलं जातं. यामध्ये ओला इलेक्ट्रिकची खोटी वेबसाईट बनवल्याचं समजतंय. ( phishing website) गाडी बुक करण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला लुटलं जातं असं एक तक्रारदार सांगतात.
या तक्रारदाराने सुरुवातीला ओला ऍप वापरलं होतं. मात्र त्यामध्ये फायनान्स ऑप्शन (Finance Option in Ola App) दिसत नसल्याने त्यांनी इतर विकल्प शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा व्यक्ती डुप्लिकेट साईटवर पोहोचला. डुप्लिकेट वेबसाईटवर याने आपलं नाव आणि आपला मोबाईल नंबर रजिस्टर केला. वैयक्तिक माहिती भरल्यानंतर एका टोळीकडून या माणसाला फोन आला आणि बुकिंगसाठी 499 रुपये भरण्यास सांगण्यात आलं. हा खरा फोनकॉल समजून या माणसाने PayU वरून ही रक्कम भरली, सोबतच डिलिव्हरीसाठीचे 13 हजार रुपये देखील भरले.
तुम्हीही प्रकारची कोणतीही गोष्ट ऑनलाईन खरेदी खरेदी करताना सावधान राहा. आपण ज्या वेबसाईटवरून गोष्टी विकत घेतोय ती वेबसाईट खरी आहे की डुप्लिकेट हे जाणून घ्या. नाहीतर फिशिंग वेबसाईटवरून तुम्ही फसवणूक होऊ शकते.
विश्वासार्ह मराठी बातम्या वाचण्यासाठी Zee24Taas चं मोबाईल ऍप डाउनलोड करा
Android Link - https://bit.ly/3ECP5qG
Apple Link - https://apple.co/3E8MIKw
आमच्या सोशल मीडिया पेजेससोबतही जोडले जा : Twitter, Facebook, Instagram, Youtube