65 वर्षीय वडिलांची हत्या करुन सावत्र आईवर केला बलात्कार! समोर आलं धक्कादायक कारण

Man Killed Father Raped Mother: हा तरुण त्याच्या आई-वडिलांपासून वेगळा राहत होता. आरोपी तरुण हा शेजारच्या गावात राहायचा. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तो त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आला होता.

Updated: Mar 8, 2023, 08:09 AM IST
65 वर्षीय वडिलांची हत्या करुन सावत्र आईवर केला बलात्कार! समोर आलं धक्कादायक कारण title=
Crime News

Youth Killed Father Raped Mother: ओदिशामधील (Odisha) जाजपुर जिल्ह्यामधील एका 20 वर्षीय तरुणाने आपल्या वडिलांची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे वडिलांची हत्या केल्याने या तरुणाने आपल्या सावत्र आईवर बालत्कार केला. संबंधित प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 

नेमकं घडलं काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना टोमका पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली. कौटुंबिक वादामधून आरोपीने आपल्या वडिलांची हत्या केली. हा तरुण त्याच्या आई-वडिलांपासून विभक्त राहत होता. या तरुणाची सावत्र आई त्याला त्याच्या वडिलांबरोबर राहू देत नसल्याने तो शेजारच्या गावात वास्तव्यास होता. रविवारी रात्री हा तरुण त्याच्या वडिलांच्या घरी गेला. वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या या तरुणाशी त्याची सावत्र आई वाद घालू लागली. वारंवार ऐकावे लागणारे टोमणे आणि वाद यामुळे संतापून या तरुणानेही आईला उत्तरं देण्यास सुरुवात केली. दरम्यान या तरुणाच्या वडिलांनीही आपल्या पत्नीची बाजू घेऊन वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर संपातलेल्या या तरुणाने धारधार शस्त्राने आपल्या वडिलांची हत्या केली.

पीडितेने दाखल केली तक्रार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या वडिलांची हत्या केल्यानंतर सावत्र आईवर बलात्कार केला. त्यानंतर हा तरुण फरार झाला. टोमका पोलीस स्थानकाचे प्रभारी निरीक्षक एस. के. पन्ना यांनी पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

कसून चौकशीत आरोपी म्हणाला...

या मुलाच्या वडिलांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपीने आपल्याच वडिलांची हत्या का केली यासंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी पोलिसी खाक्या दाखवत पोलिसांनी चौकशी केली असता या तरुणाने नेमकं काय घडलं हे सांगितलं. माझी सावत्र आई मला माझ्या वडिलांबरोबर राहून देत नव्हती, असं या तरुणाने सांगितलं. याच रागातून या तरुणाने वडिलांची हत्या केल्यानंतर सावत्र आईवर बलात्कार केल्याची घटना घडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. सर्व पुरावे आणि जबाब नोंदवून पोलीस या प्रकरणात सखोल चौकशी करत आहेत.