एनएसजी कमांडोने केली आत्महत्या

नॅशनल सिक्युरीटी गार्ड (एनएसजी) कमांडोने स्वत:च्या बायकोवर आणि बायकोच्या बहिणीवर गोळ्या झाडून  आत्महत्या केली.

Updated: Dec 5, 2017, 04:57 PM IST
एनएसजी कमांडोने केली आत्महत्या title=

नवी दिल्ली : नॅशनल सिक्युरीटी गार्ड (एनएसजी) कमांडोने स्वत:च्या बायकोवर आणि बायकोच्या बहिणीवर गोळ्या झाडून  आत्महत्या केली.

नेमकं झालं काय 

एसीपी (मानेसर) धरमवीर यांनी याबाबतची माहिती देतांना सांगितलं की एका एनएसजी कंमांडोने आधी स्वत:च्या बायकोवर आणि बायकोच्या बहिणीवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर  त्याने स्वत:वर गोळ्या झाडत आत्महत्या केली.

कारण अस्पष्ट

कमांडोच्या बायकोला आणि बायकोच्या बहिणीला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. परंतु यामागचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

एनएसजीचं महत्व

एनएसजी हे भारताची उच्च दर्जाचे कंमांडो दल आहे. ते गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतं. व्हीआयपींना संरक्षण देण्याबरोबरच दहशतवादविरोधी कारवाया या एनएसजीच्या कार्यक्षेत्रात येतात. त्यामुळेच एनएसजी तळावर होणाऱ्या प्रत्येक घटनेचं खूप गांभीर्य असतं.