नवी दिल्ली : अमेझॉनवरुन शॉपिंग करण्याव्यतिरिक्त आता तुम्ही ट्रेनची तिकीट देखील खरेदी करु शकता. अमेझॉनने इंडीयन रेल्वे इंडीयन रेल्वे कॅटरिंग एंड टूरिझम कॉर्पोरेशन ( IRCTC) सोबत तिकीट बुकींग संदर्भात एक करार करण्यात आला आहे. सुरुवातीला अमेझॉनवरुन तिकीट बुकींगवर सर्व्हीस चार्ज आणि पेमेंट गेटवे ट्रांझाक्शन चार्ज माफ केला गेला आहे. रेल्वे तिकीट बुकींग लॉंचसोबत अमेझॉनने वेगळ्या ट्रॅव्हल कॅटगरीसाठी एक पेज बनवण्यात आले आहे. या पेजवर येऊ कस्टमर फ्लाइट्स, बस आणि ट्रेनचे तिकीट बुक करु शकता.
अमेझॉनवर पहिल्यांदा ट्रेन तिकीट बुकींग करणाऱ्याला कॅशबॅक ऑफर देखील मिळणार आहे. या एप वर तिकीट बुकींगसोबतच ग्राहकांना सर्व ट्रेनच्या वेळ, उपलब्धता, तसेच पीएनआर स्टेटस तपासू शकता.
तिकीट बुकींगनंतर अमेझॉन पेवरुन पेमेंट देखील करु शकता. तसेच तिकीट रद्द झाल्यास इंस्टंट रिफंड देखील मिळणार आहे.
ट्रेन तिकीटच्या आधी गेल्यावर्षी अमेझॉनने फ्लाइट्स आणि बसच्या तिकीट बुकींगपासून सुरुवात केली होती. हे फिचर एंड्रॉइड आणि आयओएस दोन्ही फ्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.