...तर आता भारतात बनणार हे लढाऊ विमान

संरक्षण क्षेत्रामध्ये भारताला मजबूत करण्यासाठी सरकारकडे असा प्रस्ताव आला आहे ज्यामुळे चीन आणि पाकिस्तान भारताकडे नजर वर करुन देखील बघणार नाहीत.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 21, 2018, 05:14 PM IST
...तर आता भारतात बनणार हे लढाऊ विमान title=

नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रामध्ये भारताला मजबूत करण्यासाठी सरकारकडे असा प्रस्ताव आला आहे ज्यामुळे चीन आणि पाकिस्तान भारताकडे नजर वर करुन देखील बघणार नाहीत.

अमेरिकेची कंपनी लॉकहीड मार्टिनने आपल्या एफ-16 लढाऊ विमानाच्या निर्मितीसाठी भारतात त्यांच्या वायुसेनेला हव्या असलेल्या वस्तूंची निर्माण करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

कंपनीचे उपाध्यक्ष विवेक लाल यांनी म्हटलं आहे की, आमची योजना आंतरराष्ट्रीय युद्ध विमानं निर्माण क्षेत्राच्या शब्दकोषात दोन नवे शब्द भारत आणि विशेष हे जोडण्याची आहे. भारताला लक्षात घेऊनच भारतात लढाऊ विमानांचं उत्पादन विशेष असेल. आतापर्यंच असं कोणत्याही लढाऊ विमान कंपन्यांनी केलं नाही आहे.'

लाल यांनी म्हटलं की, 'यामुळे भारतीय उद्योगांना विश्वाच्या सर्वात मोठ्या लढाऊ विमान नेटवर्क कंपनीसोबत जोडण्याची संधी मिळेल. आण्ही एसेंबली लाईन पेक्षा अधिका काही बनवण्यासाठी इच्छूक आहोत.'

लाल यांनी दावा केला आहे की, 'चौथ्या पीढीचं लढाऊ विमान बनवणारी कोणतीही कंपनी लॉकहीडच्या युद्ध अनुभवाच्या आसपास देखील नाही. भारताला ज्या लढाऊ विमानाचा प्रस्ताव दिला जात आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे.'