गुजरातमध्ये आणखी एक मंत्री नाराज, रुपाणी यांच्यासमोर नवी अडचण

गुजरातमध्ये नितीन पटेल यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर भाजपची अडचण वाढली. त्यांना शांत केल्यानंतर आता आणखी एक मंत्री नाराज असल्याने मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 2, 2018, 11:51 PM IST
गुजरातमध्ये आणखी एक मंत्री नाराज, रुपाणी यांच्यासमोर नवी अडचण title=

अहमदाबाद : गुजरातमध्ये भाजपला विजय मिळवताना नाकीनऊ आलेत. काँग्रेसने मोठे आव्हान उभे केल्याने केवळ ९९ पर्यंत मजल मारला आली. त्यानंतर नितीन पटेल यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर भाजपची अडचण वाढली. त्यांना शांत केल्यानंतर आता आणखी एक मंत्री नाराज असल्याने मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.

पक्षांतर्गत मोठा धोका

गुजरातमध्ये भाजपपुढील संकटे थांबायचे नाव काही घेत नाही. मनासारखे मंत्रीपद न मिळाल्याने पुरुषोत्तम सोलंकी नाराज आहेत. त्यामुळे नितीन पटेल यांच्यानंतर त्यांची नाराजी ही भाजपसमोरील डोकेदुखी ठरली आहे. कोळी समाजातून सोलंकी हे विधानसभेवर गेले आहेत. त्यामुळे आपल्या समाजाला चांगले प्रतिनिधीत्व न मिळाल्याचा त्यांचा दावा आहे, तशी त्यांनी नाराजी व्यक्त केलेय. त्यामुळे भाजपला पक्षांतर्गत मोठा धोका असल्याचा पुन्हा एकदा स्पष्ट झालेय.

का आहेत ते नाराज?

पुरुषोत्तम सोलंकी यांना मस्य पालन मंत्रालयचा कारभार सोपविण्यात आलाय. त्यामुळे ते नाराज आहेत. जे पहिल्यांदा आमदार झालेत त्यांना चांगले मंत्रालयाचा कारभार दिलाय. कोळी समाज खास व्होट बॅंक आहे. त्यामुळे माझ्याकडे असे मंत्रालय का देण्यात आले? तसेच त्यांनी प्रश्नही उपस्थित केलाय. जर नितीन पाटील यांना विचारुन त्यांच्या आवडीचे मंत्रालय देण्यात आले. तर मग मला का विचारले नाही, असा थेट सवाल उपस्थित केलाय.

भाजपला थेट इशारा

मला जर मनासारखे मंत्रालय न मिळाल्यास मी समाजाच्या निर्णयाने पुढील पाऊल उचणार आहे, अशा थेट इशारा त्यांनी यावेळी दिला. मला देण्यात आलेले मंत्रालयावरुन मी खूश नाही. आपल्याला चांगले मंत्रालय हवे आहे. समाजातील लोक जो निर्णय घेतील त्यांच्यासोबत मी असेन. पुरुषोत्तम सोलंकी ग्रामीण मतदार संघातून विधानसभा निवडणूक जिंकली आहे. ते पाचव्यांदा आमदार झाले आहेत.