नवी दिल्ली: भारतीयांच्या कामजीवनाबाबत (सेक्स लाईफ) झालेल्या सर्व्हेक्षणात एक चकीत करणारा निष्कर्ष पुढे आला आहे. या सर्व्हे अहवालात म्हटले आहे की, देशात ३० वर्षांपेक्षा कमी वयात शारीरिक संबंध प्रस्तापीत करणाऱ्यांची संख्या ९० टक्के इतकी आहे. सरकारने नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS)२०१५-१६ मध्ये केला होता. या सर्व्हेत म्हटले आहे की, पुरूषांनी साधारण २० ते २४ या वयात असतानाच शारीरिक संबंध बनवले आहेत. तर, या तुलनेत महिलांचे वय १५ ते १९ असे राहिले आहे. वयातील हा फरक मुला-मुलींमधील विवाहाच्या हिशोबानुसार आहे. या विषयात शिक्षणाचा वाटा मोठा आहे. उच्च शिक्षणासाठी तरूणांना अधीक काळ महाविद्यालयांमध्ये घालवावा लागतो. त्यांचे लग्न होण्यास प्रदीर्घ काळ लागतो. त्यामुळे त्यांचे संबंध प्रस्थापीत करण्याचे वयही बदलले जाते. या सर्व्हेमध्ये एक निष्कर्ष असाही निघाला की, उत्तर भारतीयांचे सेक्स लाईफ हे दक्षिण भारतीयांपेक्षा अधिक चांगले आहे.
याच सर्व्हे अहवालात असेही म्हटले आहे की, विवाहपूर्व संबंध हे भारतात आजही अवैधच मानले जातात. १५ ते २४ वर्षे वयोगटातील ११ टक्के पुरूष आणि २ टक्के महिला या विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवतात. दरम्यान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये हा आकडा अनुक्रमे २१.१ टक्के आणि २०.७ टक्के आहे. एनएफएचएसने सर्व्हेक्शनाचे आकडे सुमारे एक लाख पुरूष आणि महिलांशी संवाद साधून तयार केले आहेत.
दरम्यान, एनएफएचएसच्या आकडेवारीनुसार उत्तर भारतीयांची सेक्स लाईफ ही दक्षिण भारतापेक्षा अधिक संतृष्ट आहे. हरियाणा, पंजाब, छत्तीसगढ आणि पश्चिम बंगालमध्ये केलेल्या सर्व्हेक्शनात पहिल्या ४ आठवड्यांच्या अनुभवाबाबत विचारण्यात आले. लाईव्ह मिंटमध्ये छापण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, ५५ टक्के महिला आणि पुरूषांचे म्हणने होते की, ४ आठवड्यात त्यांनी शारीरिक संबंध ठेवले. मध्य प्रदेश आणि राजस्तानमध्येही ही टक्केवारी अधिक होती. हेच प्रमाण राष्ट्रीय स्तरावर पाहिले तर, ४७ टक्के पुरूष तर, ४८ टक्के महिला आठवड्यातून चार वेळा शारीरिक संबंध ठेवतात.