Noida Twin Tower Demolition: अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर अखेर नोएडातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर आज (28 ऑगस्ट) दुपारी 2.30 वाजता पाडले जाणार आहेत. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले आहे. ही इमारत पाडण्यासाठी 46 जणांची टीम काम करत आहे.
जमीनदोस्त होणारी देशातील ही पहिली उंच इमारत असेल. मात्र ट्विन टॉवर्समध्ये फ्लॅट खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण ट्विन टॉवर्समध्ये 711 जणांनी फ्लॅट खरेदी केले होते. त्यामधील अनेक 59 ग्राहकांना अद्याप रिफंड मिळालेला नाही. नक्की काय आहे प्रकरण ते आपण सविस्तर जाणून घेऊयात...
नोएडाच्या सेक्टर 93A मध्ये असलेली 32 मजली ट्विन टॉवर्स काही क्षणात उध्वस्त केले जाणार आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या 15 सेकंदात पूर्ण होईल. खबरदारी म्हणून परिसरातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. यासोबतच आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना आज सकाळीच सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आले. पण या सुपरटेक ट्विन टॉवर्समधील फ्लॅट खरेदी करण्याची संख्या मोठया प्रमाणात होती. मात्र त्यामधील काहीजणांना अद्याप परतावा मिळालेला नाही. प्रत्यक्षात ट्विन टॉवर्समध्ये 711 जणांनी फ्लॅट खरेदी केले होते. त्यापैकी 652 लोकांशी सेटलमेंट झाली आहे. तर 59 ग्राहकांना अद्याप परतावा मिळालेला नाही.
दरम्यान, ट्विन टॉवर्समध्ये फ्लॅट खरेदी करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, त्यांचे पैसे परत केले पाहिजेत. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी पार पडली आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणी करताना सांगितले की, सुपरटेक गृहखरेदीदारांना काही रक्कम देण्यासाठी आयपीआर सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. त्याच वेळी, याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी म्हटले होते की, खरेदीदारांचे एकूण 5.15 कोटी रुपये प्रलंबित आहेत. याबाबत सीआरबी आणि सुपरटेकच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे.
711 जणांनी फ्लॅट बुक केले होते, 59 जणांना परतावा मिळाला नाही
ट्विन टॉवर्समध्ये 711 ग्राहकांनी फ्लॅट बुक केले होते. सुपरटेकने 652 ग्राहकांची सेटलमेंट केली आहे. यामध्ये पण फ्लॅट बुकिंगची रक्कम आणि व्याजची रक्कम मिळून या ग्राहकांना परतावा देण्यात आला आहे. मात्र फ्लॅट विक्रीच्या वेळी सुपरटेक एमराल्डने ग्राहकांकडून flat Booking Value + Interstate मिळून जादा पैसे घेण्यात आले होते. मात्र पैसे रिफंड करताना कमी पैसे ग्राहकांना देण्यात आले. अशा आरोप ट्विन टॉवर्समधील ग्राहकांकडून करण्यात आला आहे. त्यामध्येही ट्विन टॉवर्सच्या 59 ग्राहकांना अद्याप परतावा मिळालेला नाही.
31 मार्च रिफंडची शेवटची तारीख होती...
31 मार्च 2022 ही परताव्याची अंतिम तारीख होती. प्रत्यक्षात, सुपरटेक 25 मार्च रोजी दिवाळखोरीत गेल्यामुळे परतावा प्रक्रिया पूर्ण झाली नाही. काही लोकांना भूखंड/फ्लॅट देऊन थकबाकीची रक्कम नंतर देण्याचे आश्वासन अद्याप अपूर्ण आहे.
ट्विन टॉवर्स का बनला धोकादायक?
खरेदीदारांचा आरोप आहे की, हे टॉवर बनवताना नियम डावलण्यात आले आहेत. टॉवरची उंची जसजशी वाढत जातं, तसतशी दोन टॉवरमधील अंतर वाढत जातं. अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एमराल्ड कोर्ट ते एपेक्स किंवा सिएना हे किमान अंतर 16 मीटर असावं. पण एमराल्ड कोर्टच्या टॉवरपासून त्याचं अंतर फक्त 9 मीटर होतं. या नियमाचं उल्लंघन केल्याबद्दल नोएडा प्राधिकरणाकडून अग्निशमन अधिकाऱ्यांना कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही. उंच टॉवरच्या उंचीवर वारा, सूर्यप्रकाश थांबतो, त्यामुळे दोन टॉवर्समध्ये 16 मीटर अंतर असावं, असा नियम आहे. दोन टॉवर्समधील अंतर कमी असल्यानं आग पसरण्याचा धोका वाढतो.