Noida Fashion Show Accident: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) नोएडा (Noida) येथील फिल्म सिटीमध्ये झालेल्या विचित्र अपघातात 24 वर्षीय मॉडेलचा मृत्यू झाला आहे. येथील एका कार्यक्रमात रॅम्पवॉक करताना स्टेजवर लावलेला लाईटचा सेटअप या तरुणीवर पडला. प्रचंड वजनाचा हा धातूचा साचा या तरुणीवर पडल्याने तिचा मृत्यू झाला आहे. हा अपघात लक्ष्मी स्टुडिओमध्ये एका फॅशन शोदरम्यान रविवारी रात्री घडला.
अपघातामध्ये वृषिका चोप्रा नावाची 24 वर्षीय मॉडेल गंभीर जखमी झाली. तिला तातडीने कैलाश हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला रुग्णालयात दाखल करुन घेण्याआधीच मृत घोषित केलं. वृषिका ही नोएडा एक्सटेन्शनचा भाग असलेल्या गौर सिटी-2 मध्ये वास्तव्यास होती. वृषिकाचा मित्र बॉबी राक हा सुद्धा या अपघातात जखमी झाला आहे. मूळच्या अग्र्याचा असलेल्या बॉबीच्या डोक्याला दुखापत झाली असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याच्यावर एक छोटी सर्जरीही केली जाणार आहे. या अपघातासंदर्भात नोएडा पोलिसांनी एक पत्रक जारी केलं आहे. "सेक्टर 20 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या फिल्म सिटीमध्ये आज दुपारी दीड वाजल्यापासून फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. याच ठिकाणी लाइटचा सेटअप पडल्याने वृषिका चोप्रा या तरुणीचा मृत्यू झाला असून बॉबी नावाचा तरुण जखमी झाला आहे. वृषिकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सेक्टर 27 मधील कैलाश हॉस्पीटलमध्ये जखमी व्यक्तीवर उपचार सुरु आहेत," असं नोएडा पोलिसांनी म्हटलं आहे.
या दुर्घटनेनंतर घटनास्थळावरील व्हिडीओ आणि फोटो तुफान व्हायरल होत आहेत. अनेकांनी हे व्हिडीओ पाहून आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या दृष्ट्यांमध्ये पडलेल्या लाईटच्या सेटअपमुळे जखमी झालेल्या व्यक्तीला काही लोक धीर देण्याचा आणि शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
1)
Noida: In an unfortunate incident, a model died after a lighting truss fell on her during a fashion show at Noida Film City on Sunday. one person also got injured in the accident. The victim was identified as Vanshika Chopra, a resident of Gaur City-2, Greater Noida pic.twitter.com/HDivv0VNbN
— AMAN_RAWAT_OFFICIAL (@aman45497) June 12, 2023
2)
Accident took place in Noida Film city, one death reported (model name - Vanshika) pic.twitter.com/PKWr6XlYJP
— PANKAJ KUMAR (@Headlineznow) June 11, 2023
या प्रकरणामध्ये पोलिसांनी फॅशन शोच्या आयोजकाला आणि या लाईटींगचं काम करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून तपासानंतर अधिक लोकांवर गरज पडल्यास कारवाई केली जाईल अशी माहिती नोएडा पोलिसचे अतिरिक्त उपायुक्त शक्ती अवस्थी यांनी दिली.