नागपूर : ब्राह्मोस क्षेपणास्त्रासंदर्भातील गोपनिय माहिती पाकिस्तानला पुरवल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या निशांत अग्रवालची पुढची चौकशी आता उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत होणार आहे. आज उत्तरप्रदेश दहशतवाद विरोधीपथाकानं निशांत अग्रवालाला नागपूरमध्ये न्यायालयता हजर केलं. न्यायालयानं निशांतसाठी पोलिसांना तीन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केलाय. आता त्याचा ताबा उत्तरप्रदेश पोलिसांना मिळाला असून पुढची चौकशी लखनऊत होईल.
ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट अंतर्गत उत्तर प्रदेश एटीएसनं सोमवारी त्याला अटक केली होती. रात्रभर चौकशी करुन आता त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.
निशांत अग्रवाल गेल्या चार वर्षांपासून ब्राह्मोस ऐरोस्पेसमध्ये सिस्टम इंजिनिअर म्हणून काम करीत होता... तो ४० जणांच्या टीमचे नेतृत्व करायचा... उत्तर प्रदेश पोलिसांनी सुमारे दीड महिन्यांपूर्वी बीएसएफचा जवान अच्युतानंद मिश्राला अटक केल्यावर निशांत अग्रवालचे नाव समोर आलंय.