नवी दिल्ली : निर्भया प्रकरणातील (Nirbhaya Case) आणखी एक दोषी विनय शर्मा (Vinay Sharma) याला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा झटका दिला आहे. न्यायमूर्ती आर भानुमति यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दोषी विनय शर्माची याचिका फेटाळून लावली. वास्तविक, विनयने राष्ट्रपतींच्या दया याचिका फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान दिले. दोषी विनयने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते की, त्यांच्या प्रकरणात राजकारण केले गेले आहे आणि राष्ट्रपतींना पाठविलेला सल्ला पक्षपाती आणि पूर्वग्रहदानाचा आहे.
#BreakingNews । निर्भया प्रकरणातील आणखी एक दोषी विनय शर्मा याला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायमूर्ती आर भानुमति यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दोषी विनय शर्माची याचिका फेटाळून लावली. https://t.co/hzyv5wR9Gn pic.twitter.com/9rjlJN36ZC
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 14, 2020
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दया याचिका फेटाळल्याच्या विरोधात मुकेशची याचिका फेटाळली होती. यासह न्यायमूर्ती आर भानुमति यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने राष्ट्रपतींच्या दया याचिका फेटाळण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते. वास्तविक, दया याचिका फेटाळून लावण्याच्या राष्ट्रपतींच्या निर्णयाला आव्हान देत मुकेश यांने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. १ फेब्रुवारीच्या डेथ वॉरंटवर स्थगिती देण्याची मागणीही याचिकेत केली होती.
यानंतर सर्वोच्च न्यायालयाने चारही दोषींना नोटीस बजावत निर्भयाच्या दोषींना स्वतंत्रपणे फाशी द्यावी, या मागणीसाठी केंद्र सरकारच्या याचिकेवर जाब विचारला होता. केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते. ज्यात न्यायालयाने दोषींना स्वतंत्रपणे फाशी देऊ शकत नाही, असे म्हटले होते. तसेच दोषींकडून जाणीवपूर्वक विलंब करण्यात येत असल्याचे म्हटले होते.