नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यातील चौकशी जशी-जशी पुढे जात आहे तसं या प्रकरणात अनेक लोकं गुंतत चालले आहेत.
या घोटाळ्यात मामा-भाचा यांच्या अनेक कृत्याचा पर्दाफाश होतो आहे. ईडीला शंका आहे की, नीरव मोदी आणि मेहुल चौकसीने 144 कंपन्यांच्या माध्यमातून बँकांना चुना लावला आहे. FDI मेथडच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग केल्याची शंका ईडी आहे.
याआधी ईडीने गुरुवारी नीरव मोदीच्य़ा एका गोदामातून अनेक महागडी घड्याळ जप्त केली होती. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, आता त्यांना जप्त केलेल्या या वस्तुंचं मूल्य ठरवायचं आहे. पण अंदाजे याची रक्कम कोटींमध्ये जाईल.
नीरव मोदीच्या वरळीमधील समुद्र महल येथील 4 फ्लॅटमधील महागड्या वस्तू देखील जप्त करण्यात आल्या आहेत. ईडीने नीरव मोदीच्या नावावर असलेली 30 कोटी रुपयांचं एक अकाउंट आणि वेगवेगळ्या फर्म्समधील 14 कोटी रुपयांचे शेअर देखील जप्त केले आहेत. संपूर्ण देशातील नीरव मोदी आणि त्याच्या सहकाऱ्यांची संपत्तीची माहिती घेतली जात आहे. त्यानंतर ती देखील जप्त केली जाईल.