चाकूने वार करत केली सहविद्यार्थ्याची हत्या....

रायन इंटरनॅशल स्कुल मधील ७ वर्षाच्या प्रद्युम्नचे हत्या प्रकरण ताजे असताना अजून एक धक्कदायक घटना समोर आली आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 16, 2017, 08:52 PM IST
चाकूने वार करत केली सहविद्यार्थ्याची हत्या.... title=

नवी दिल्ली : रायन इंटरनॅशल स्कुल मधील ७ वर्षाच्या प्रद्युम्नचे हत्या प्रकरण ताजे असताना अजून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. दिल्लीत सरकारी शाळेत शिकणाऱ्या नववीतील एका विद्यार्थ्याने आपल्या बरोबर शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर चाकूने वार करून हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन समूहात भांडण सुरु होते. त्यावेळेस आरोपी विद्यार्थीवर दोन गटात भांडण लावण्याचा आरोप करण्यात आला. 

त्यावेळेस रागात त्याने खिशातील चाकू काढून सोबतच्या विद्यार्थ्यावर हल्ला केला. ही घटना संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली. त्यानंतर तातडीने त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे.