एका शाळेतील नववीच्या दोन विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षिकेचा AI च्या मदतीने अश्लील फोटो बनवला आहे. एवढंच नव्हे हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये घडली आहे.
सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनचे प्रभारी (एसएचओ) मनीष सक्सेना यांनी शनिवारी सांगितले, "गुरुवारी या प्रकरणाबाबत तक्रार नोंदवण्यात आली. ज्याच्या आधारे दोन अल्पवयीन आरोपींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सविस्तर तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी त्यांच्या शाळेतील शिक्षकाची बनावट अश्लील फोटो तयार करण्यासाठी ऑनलाइन AI टूल्सचा वापर केला, जी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली. आरोपींनी विविध सोशल मीडिया ग्रुपवर फोटोही शेअर केले. याप्रकरणी पीडित शाळेतील शिक्षिकेने गुरुवारी पोलिसांकडे धाव घेतली. स्थानिक पोलीस वेबवरून आक्षेपार्ह छायाचित्रे हटवण्याचा प्रयत्न करत आहेत.