निधी चौधरी यांची पाणी पुरवठा विभागात बदली, गांधींजींबद्दलचे ट्विट भोवले

निधी चौधरी यांची मुंबई महापालिकेतून मंत्रालयात बदली करण्यात आली आहे.

Updated: Jun 3, 2019, 04:47 PM IST
निधी चौधरी यांची पाणी पुरवठा विभागात बदली, गांधींजींबद्दलचे ट्विट भोवले title=

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर IAS अधिकारी आणि महापालिका उपायुक्त निधी चौधरी या वादात अडकल्या होत्या. आता त्यांना हे विधान भोवल्याचे स्पष्ट होत आहे. निधी चौधरी यांची मुंबई महापालिकेतून मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे. 

NEW APP, DESKTOP ALERT

वादग्रस्त ट्विटनंतर निधी चौधरी यांची मंत्रालयात पाणी पुरवठा विभागात बदली करण्यात आली आहे. चौधरी यांना राज्य सरकारची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. चौधरी यांच्या ट्विटची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. निधी चौधरी या मुंबई महापालिकेच्या उपायुक्त आहेत.